Advertisement

चंद्रकांत रघुवंशी यांच्या फोटोला जोडे मारून आदिवासी संघटनांचे आंदोलन

शहादा प्रतिनिधी : आदिवासी नेते तथा माजी क्रीडा मंत्री मा. पद्माकर वळवी यांना नंदूरबार जिल्ह्य़ात फिरू देणार नाही,अशी जीवे ठार मारण्याची धमकी देणा-या व आदिवासी समाजात तेढ निर्माण करणा-या श्री.चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदे गट नंदूरबार यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा,या मागणीचे निवेदन आदिवासी संघटनांमार्फत पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्स, भारत आदिवासी संविधान सेना, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन सह विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
                        चंद्रकांत सूर्यकांत शिवसेना शिंदे गट नंदूरबार ( मु.पो.ता.जि.नंदुरबार) यांनी आदिवासी नेते तथा माजी मंत्री पद्माकर वळवी यांना नंदूरबार जिल्ह्य़ात फिरू देणार नाही, अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी नंदुरबार जिल्ह्य़ातील धडगांव येथील एका कार्यक्रमात दिली आहे.चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदूरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात घुसखोरी करून नंदूरबार जिल्ह्य़ातील मूळनिवासी आदिवासी नेत्यांनाच धमकी देणे, हे आम्ही जिल्ह्य़ातील आदिवासी बांधव कदापी खपवून घेणार नाहीत. आदिवासी जिल्ह्य़ात राहून आदिवासींनाच धमकी देणे , ही एक निंदनीय बाब आहे.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अशा बेताल व वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही नंदूरबार जिल्हा समस्त आदिवासी समाजातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो.पद्माकर वळवी हे आदिवासी अभ्यासक व कायदेतज्ज्ञ आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला जेवढे अधिकार आहेत, तेवढेच वापरावेत, कायद्याच्या बाहेर जाऊन घटनाबाह्य धनगरांना आदिवासींत आरक्षण देऊ नये,मुख्यमंत्री हे पुल व रस्ते वाटत आहेत, तसे आदिवासींचे आरक्षण कुणालाही वाटू नये,असे आपल्या भाषणातून सल्ला दिला आहे. पद्माकर वळवी यांनी आदिवासींची बाजू धरून जे काही बोलले त्याचे आम्ही समर्थन करतो.जे कोणी आमच्या समाजाच्या बाजूने बोलत आहेत, त्या सर्व आदिवासी नेत्यांचे आम्ही जाहीरपणे समर्थन करीत आहोत. परंतु जे कोणी आदिवासींच्या विरोधात बोलत आहेत, आदिवासींना धमकावत आहेत, आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी करण्याच्या हेतूने बोलत आहेत. त्यांचा आम्ही जाहीर विरोध करीत आहोत. 
                आपले हक्क व अधिकार अबाधित राहावेत व मिळावेत यासाठी सरकार विरोधात आदिवासी समाज संतापलेला आहे.अशा परिस्थितीत चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी नेते पद्माकर वळवी यांना दिलेल्या धमकीमुळे आदिवासी समाजांत तीव्र संताप निर्माण झालेला आहे.चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, आदिवासी समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे.कायदा व सुवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे.म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी.अन्यथा आदिवासींच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. कायदा व सुव्यवस्था बिघडेल. म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी,अन्यथा आदिवासी समाजाकडून तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांनी प्रशासनास दिला आहे.

Post a Comment

0 Comments