Advertisement

शहादा तळोदा विधानसभेत बिरसा फायटर्सच्या गोपाल भंडारी यांची आघाडी; दुस-या क्रमांकावर भाजपचे राजेश पाडवी


पक्षांच्या उमेदवारांपेक्षा संघटनेच्या उमेदवाराला पसंती

शहादा प्रतिनिधी: आगामी शहादा- तळोदा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत जनतेच्या मनातील आमदार कोण जिंकेल? असा एका स्ट्राॅ पोलवर ऑनलाईन मतदान करण्यासाठी लिंक टाकण्यात आली. या लिंकवर शहादा- तळोदा विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची नावे टाकण्यात आली.यात बिरसा फायटर्सचे उमेदवार गोपाल भंडारी,भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार राजेश पाडवी,काँग्रेसचे इच्छुक उमेदवार तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, काँग्रेसचे शहादा तालुकाध्यक्ष सुरेश नाईक, काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष पटले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी ,काँग्रेस पक्षाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी,राष्ट्र वादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे इत्यादी ८ इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे. मतदारांच्या पसंतीनुसार बिरसा फायटर्सचे उमेदवार गोपाल भंडारी यांना १३२ मते म्हणजेच ४० टक्के मते, भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी यांना ६२ मते म्हणजेच २१ टक्के मते, सुहास नाईक यांना ४१ मते म्हणजेच १३ टक्के मते,सुरेश नाईक यांना १८ मते म्हणजेच ६ टक्के मते,सुभाष पटले यांना १४ मते म्हणजेच ४ टक्के मते,उदेसिंग पाडवी यांना १२ मते म्हणजेच ४ टक्के मते,सीमा वळवी यांना ९ मते म्हणजेच ३ टक्के मते,मोहन शेवाळे यांना ५ मते म्हणजेच टक्के मते मिळाली आहेत. पोलींग वोटची लिंक ५ पेक्षा अधिक वाॅटसप ग्रूपवर टाकण्यात आली.बिरसा फायटर्सचे गोपाल भंडारी हे सर्वाधिक मते मिळवत आघाडीवर आहेत. शहादा तळोदा मतदारसंघात अनेक पक्षाचे उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत असले तरी पक्षाच्या उमेदवारांपेक्षा संघटनेच्या उमेदवाराला मतदारांची पसंती मिळत आहे.त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
                     गेल्या लोकसभा निवडणुकीत बिरसा फायटर्स संघटनेकडून नंदूरबार लोकसभा मतदारसंघात सुशिलकुमार पावरा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत चौथा क्रमांकावर मते मिळवून आपली चांगली छाप सोडली आहे.त्यांनी अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मागे टाकले.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा बिरसा फायटर्स संघटनेचे उमेदवार हे राजकीय पक्षाच्या उमेदवाराला भारी पडतील अशी चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments