Advertisement

कुंडाणे वार राम मंदिर येथे, इतरांचा आदर महिलांचा सन्मान व शिव्या मुक्त समाज अभियान याविषयी एक दिवशीय जनजागृती कार्यक्रम संपन्न

कुंडाणे (वार) :- प्रतिनिधी 

कुंडाणे (वार) :- दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी समता शिक्षण संस्था पुणे, संचलितडॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे येथील बी.एस.डब्ल्यू .भाग एक,दोन, तीन व एम.एस.डब्ल्यू एक,दोन प्रशिक्षणार्थी प्रा.डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ. सुदाम राठोड, व प्रा. श्याम सिंग वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडाणे (वार ) ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने "इतरांचा आदर महिलांचा सन्मान व शिव्या मुक्त समाज अभियान एक दिवशीय विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 
*कार्यक्रमाचे अध्यक्ष:-* कांबळे बाबा ( माजी सरपंच कुंडाणे-(वार) )
*प्रमुख वक्ते* :- 1.भावना पाटील ( सखी वन स्टॉप सेंटर समुपदेशक ),
2. सपना देवरे ( सखी वन स्टॉप सेंटर,मेडिकल स्टाफ ),
*कार्यक्रमाचे मार्गदर्शक*
1. प्रा. डॉ. रघुनाथ महाजन 
2. प्रा. डॉ. सुदाम राठोड 
3. प्रा.श्यामसिंग वळवी 
*कार्यक्रमाची रूपरेषा*:- सुरुवातीला संपूर्ण गावामध्ये रॅली च्या माध्यमातून घोषणा देण्यात आल्या व पोस्टर प्रदर्शन करण्यात आले. तसेच गावातील चौकात पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रमुख व्याख्याते, कार्यक्रमाचे मार्गदर्शक, व जि.प.शाळा कुंडाणे -( वार ) येथील उपस्थित महिला शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उनेश्वर गावित आणि प्रास्ताविक मयुरी जाधव यांनी केले. त्यानंतर सदर कार्यक्रमाला लागलेले प्रमुख वक्ते भावना पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यात समाजामध्ये कशाप्रकारे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव केला जातो.तसेच स्त्रियांवर विविध प्रकारचे बंधने लावले जातात त्यांचे हक्क हिसकावून घेतले जातात. तसेच महिलांचे हक्क त्यांच्याविषयी असलेले कायदे आणि त्याचप्रमाणे शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजना बद्दल कार्यक्रमात उपस्थित महिलांना व लोकांना माहिती सांगितली त्याच प्रकारे सद्या महिलांवर होणारे अन्याय अत्याचार होत आहे याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच सपना देवरे यांनी देखील मार्गदर्शन केले. सखी वन स्टॉप सेंटर चे कार्य, सेवा सुविधा तसेच महिलांना कशाप्रकारे मदत केली जाते इ. माहिती सांगितली व सदर कार्यक्रमात उपस्थित लोकांना हेल्पलाइन नंबर देखील सांगण्यात आला.अशा प्रकारे सदर कार्यक्रमात उपस्थित कुंडाणे गावातील लोकांना मार्गदर्शन करण्यात आले.
*अध्यक्षीय समारोप*:- कुंडाणे गावाचे माजी सरपंच कांबळे बाबा यांनी अध्यक्ष म्हणून सदर कार्यक्रमाचे समारोप भाषण केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमित बागुल यांनी केले. त्यात प्रमुख व्याख्याते, कार्यक्रमाचे मार्गदर्शक, कार्यक्रमाचे अध्यक्ष, जि.प. शाळा मधील विद्यार्थी, कुंडाणे गावातील इतर उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे येथील उपस्थित बी.एस. डब्ल्यू भाग एक ते तीन व एम.एस. डब्ल्यू भाग एक दोन या प्रशिक्षणार्थी यांचा देखील आभार व्यक्त केला आणि अध्यक्ष यांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले. 
अशाप्रकारे एक दिवशीय विशेष जनजागृती कार्यक्रम वरील कार्यक्रम मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments