Advertisement

मालदा ते धजापाणीचा डांबरीकरण केलेला निष्कृष्ट रस्ता एकाच दिवसात उखडला

ठेकेदार व अभियंत्यांवर कारवाई करा- बिरसा फायटर्सची मागणी

तळोदा प्रतिनिधी- तळोदा तालुक्यातील मालदा ते धजापाणी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कामाची सखोल चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करा ,रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण नव्याने करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग तळोदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे,जिल्हा कार्याध्यक्ष डोंगरसिंग पावरा,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,फेका पावरा,मुन्ना पावरा,दयानंद वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
                         तळोदा तालुक्यातील मालदा ते धजापानीचा रस्ता  मुख्यमंत्री सडक योजनेतून  चार कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात येत आहे.काही दिवसांतच हाताने खरडताच त्या  रस्त्याचं डांबर निघाल.पायानेही रस्त्यावरचे डांबरीकरण निघत आहे.रस्त्यावरील डांबराचा थर सहजपणे हाताने निघत आहे. अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम संबंधित ठेकेदार व अभियंता करीत आहेत. 
                  सरकारकडून आदिवासी भागात विकास कामे केल्याचा गाजावाजा केला जातो.परंतु आदिवासी भागात अशे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे काम पाहायला मिळते.तालुक्यात जिकडे तिकडे खड्डेमय रस्ते आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे लोक हैराण आहेत. रस्त्याचे असे निष्कृष्ट काम करून ठेकेदार व अभियंता हे आदिवासींची थट्टा करत आहेत. या रस्त्याचे काम काटकसरीने केले जात आहे,कामात कुचराई करण्यात येत आहे.रस्त्याच्या कामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचा दिसते.मालदा ते धजापाणी येथील रस्त्याच्या निष्कृष्ट कामाचा विडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.तरी तळोदा तालुक्यातील मालदा ते धजापाणी रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व रस्ते नव्याने बनविण्यात यावा.संबंधित ठेकेदारावर व अभियंत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून बांधकाम विभागास देण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments