Advertisement

गरताड गावात शिव्या मुक्त समाज, इतरांचा आदर, महिलांचा सन्मान याविषयी जनजागृती रॅली काडून पथनाट्याचे सादरीकरण

गरताड -प्रतिनिधी 

गरताड :- समता शिक्षण संस्था पुणे, संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे अंतर्गत आज दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी गरताड गावात सकाळी 10 वाजता शिव्या मुक्त समाज व इतरांचा आदर आणि महिलांचा सन्मान या विषयी जनजागृती रॅली काढून पथनाट्य सादरीकरण केले. समाजात महिलांना विविध ठिकाणी मानसन्मान दिला जात नाही. महिलांना कुटुंबामध्ये निर्णय घेतले जाऊ देत नाही. तसेच शाळेमध्ये जात असलेल्या मुलींची रस्त्यावर व बस मध्ये जात असताना मुले छेडछाड करण्याच्या प्रयत्न करत असतात. त्यामुळे महिलांचा सन्मान केला पाहिजे व आदर केला पाहिजे. आई बहिणींवर शिव्या देणे थांबलं पाहिजे. जर आपण युवकांना बाहेर रात्री फिरू दिलं नाही तर महिलांवर होणारे अत्याचार थांबतील. मुलींना देखील बाहेर फेरी दिले जाऊ नये. मुलींचे मोहल खराब करणारे युवकच असतात त्यामुळे त्यांना बाहेर दिले जाऊ नये. तरच आपल्या भारत देशातील महिलांवर होणारे अन्याय अत्याचार बलात्कार सारख्या थांबतील. आपण बघतो की,समाजामध्ये आई बहिणी वरून अपशब्द वापरून बोलले जातात त्यामुळे ते थांबले पाहिजे. शिव्या मुक्त समाज घडवण्यासाठी आपल्या स्वतःच्या कुटुंबातूनच आधी सुरुवात केली पाहिजे नंतर समाजात याविषयी लोकांमध्ये जनजागृती करणे व माहिती देणे. कार्यक्रम घेणे गरजेचे आहे.तरच आपला समाज शिव्या मुक्त समाज बनेल, अशा प्रकारची माहिती पथनाट्यद्वारे सादरीकरण करून गरताड गावातील महिला, पुरुष मुले,मुली,यांना जनजागृती व्हायला पाहिजे, म्हणून माहिती देण्याचे काम केले. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या शिव्या मुक्त समाज व इतरांचा आदर आणि महिलांचा सन्मान या विषयावर घोषणा देण्यात आल्या. यावेळी जनजागृती रॅलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे येथील क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रमोद भुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. एस.डब्ल्यू.भाग एक व दोन, बी. एस.डब्ल्यू. भाग एक दोन तीन च्या प्रशिक्षणार्थींनी पथनाट्य व जनजागृती रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. 
या कार्यक्रमात गरताड गावातील महिला पुरुष लहान मुले मुली पथनाट्य बघण्यासाठी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments