Advertisement

कै.भाऊसाहेब सुपडूजीराव देवरे माध्यमिक विद्यालय रावेर येथे, इतरांचा आदर महिलांचा सन्मान याविषयी जनजागृती शिबीर संपन्न

रावेर :- प्रतिनिधी 

रावेर :- दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे येथील एम. एस.डब्ल्यू भाग एक दोन, व बी.एस. डब्ल्यू.एक दोन तीन प्रशिक्षणार्थींनी प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे, प्रा. डॉ. संजीव पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कै. भाऊसाहेब सूपडुजीराव देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने "आयोजित इतरांचा आदर आणि महिलांचा सन्मान"हा एक दिवसीय विशेष जनजागृती शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष कै. भाऊसाहेब सुपडूजीराव देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रावेर येथील मुख्याध्यापक कैलास मूलचंद देवरे कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर दिपाली साहेबराव देवरे (रावेर येथील सरपंच) 
 गौतम यशोदा तुकाराम वाघ 
(बाल संरक्षणाधिकारी) 
डॉ. ईश्वर पाटील (जिल्हा समन्वयक पंचायत समिती, धुळे) प्रा. डॉ. संजीव पगारे 
प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे 
श्री. उमेश दौलत खैरनार (शिक्षक इंदिरानगर) 
सुरेखा पाटील (जि.प.शाळा शिक्षिका रावेर)
        कार्यक्रमाची रूपरेषा 
सुरुवातीला संपूर्ण गावांमध्ये पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.
रावेर व तसेच इंदिरानगर या गावांमधून रॅली काढण्यात आली.
त्यानंतर सामाजिक गीत 
तसेच पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा वाघ यांनी केले. प्रस्ताविक मानसी मुसळे यांनी केले. अध्यक्ष भाषण ॲड. शितल जावरे (धुळे वन स्टॉप सेंटर) यांनी केले.
           प्रमुख वक्ते म्हणून गौतम वाघ (बाल संरक्षण अधिकारी) यांनी मार्गदर्शन केले.
समाजामध्ये कशाप्रकारे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव केला जातो. तसेच स्त्रियांवर विविध प्रकारचे बंधने लादले जातात त्यांचे हक्क हिसकवून घेतले जाते,तरी महिलांचे हक्क त्यांच्याविषयी असलेले कायदे आणि त्याचप्रमाणे सरकारच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजना बद्दल माहिती सांगितली. त्याच प्रकारे सध्या स्थितीमध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचार होत आहे,त्याविषयी देखील माहिती सांगितली. तसेच बालकांचे हक्क व कायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर गुड टच आणि बॅड टच याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महिला व बालकांविषयी असलेल्या कायद्यामध्ये असलेल्या विविध तरतुदी विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
         एडवोकेट शितल जावरे यांनी सखी वन स्टॉप सेंटर बद्दल सविस्तर माहिती सांगितली. कोणाला मदत हवी असेल त्यासाठी टोल फ्री नंबर देखील सांगितला (181) त्याचप्रमाणे सखी वन स्टॉप सेंटर अंतर्गत महिलांना मिळणाऱ्या विविध सुविधा बाबत चर्चा करण्यात आली.
         अशाप्रकारे अध्यक्षांच्या मार्गदर्शनाने आजचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते कै.भाऊसाहेब सूपडुजीराव देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रावेर या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. 
यावेळी डॉ. समाजकार्य बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील, एम. एस. डब्ल्यू. बी. एस. डब्ल्यू. चे प्रशिक्षणार्थी व शिक्षक, कै. भाऊसाहेब सुपडूजीराव देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रावेर येथील, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments