Advertisement

खोटे वनपट्टे रद्द करा-बिरसा फायटर्सची मागणी


उपविभागीय अधिकारी शहादा यांना निवेदन

शहादा प्रतिनिधी: शहादा तालुक्यातील खोट्या वनपट्टे धारकांची सखोल चौकशी करून वनपट्टे रद्द करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,करन चव्हाण, विलास पाडवी,मगन पाडवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                    नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा तालुक्यात अनेक वनपट्टे धारक हे खोट्या कागदपत्रांच्या आधारे खोटे वनपट्टे बनवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. ज्यांच्या नावावर शेती नाही किंवा ज्यांची शेती नाही ,त्यांनीही  खोट्या कागदपत्राच्या आधारे वनपट्टे बनवून घेतले आहेत. खोट्या वनपट्टे धारक वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत व ख-या वनपट्टे धारकांना कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही.ही अत्यंत गंभीर बाब आहे.म्हणून शहादा तालुक्यातील शहाणा,वडगांव, कोडपांढरी, चांदसैली,लंगडी, गोटाळी, मलगांव, भुलाणे,सटीपाणी,आबणपुरा,भोंगरा, दुधखेडा, नवानगर, नवागाव ,कंसाई, नागझिरी, करडे,मानमोडे, राणीपूर व इतर असंख्य गांवांत खोटे वनपट्टे बनविण्यात आले आहेत. त्यांची सखोल चौकशी करून खोट्या वनपट्टे धारकांवर कायदेशीर कारवाई करावी व ख-या वनपट्टे धारकांनाच वनपट्टे मिळावेत. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments