शहादा प्रतिनिधी: शहादा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पैशे लाच देऊन फटक्यात काम होत असल्याचे संभाषण सध्या सोशल मिडीयावर वायरल होत आहे.उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्या अंगठ्यासाठी अर्जदाराकडून संबंधित लिपीकाने ५०० रूपये लाच मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवण्यासाठी संबंधित अर्जदाराचे जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्याकडे नेण्यात आले होते.परंतु त्यांनी त्यावर अंगठा वा सही केली नाही. त्यानंतर कार्यालयातील संबंधित लिपीकाला ५०० रूपये दिल्यानंतर लगेच जातीच्या दाखल्यावर साहेबांचा अंगठा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.शहादा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पैशे देऊन कामे केली जातात, असा तोंडी आरोप काही तक्रारदार करत होते.त्या आरोपांना या पुराव्यांमुळे पुष्टी मिळाली आहे.आरोप खरे ठरले आहेत.
शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी हे भ्रष्ट अधिकारी आहेत, बिनकामाचे व निष्क्रिय अधिकारी आहेत, पुढा-यांचे ऐकून कामे करतात, भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालतात,असा आरोप लोकसभेचे उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.लोकसभा निवडणूकीत नंदूरबार मतदारसंघात भोंगरा व जाम येथील काही जणांनी मतदारांना धमकी देत खुलेआम पैसे वाटल्याचे विडीओ सोशल मिडीयावर वायरल झाले होते.पैसे वाटल्याचे विडीओ उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्याकडे सादर करण्यात आले.त्यानंतर सुशिलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल केली. भोंगरा येथील प्रकरणात भ्रष्टाचारी लोकांना वाचविण्यासाठी सुभाष दळवी यांनी पेनड्राईव्ह मध्ये सादर करण्यात आलेला पैसे वाटल्याचा विडीओ गायब केला.त्यानंतर दुस-यांदा विडीओ सुभाष दळवी यांना देण्यात आला.तरीही संबंधितांवर कारवाई करण्यास दिरंगाई करीत टाळाटाळ करीत आहेत.भोंगरा व जाम येथील पैशे वाटणा-यांविरोधात कारवाई करा,या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर अनेकदा उपोषण केली.जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी सुभाष दळवी यांना वारंवार निर्देश देऊनही प्रकरणांची जाणीवपूर्वक चौकशी करत नाहीत.
भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणा-या सुभाषच दळवी उपविभागीय अधिकारी शहादा यांची पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करू नका,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील पात्र केलेले ७ वनदावे आकसापोटी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी जाणीवपूर्वक अपात्र करून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे पाठवले आहेत.
जातीच्या दाखल्यावर अंगठा देण्यासाठी लिपीकामार्फत लाच मागणे,लोकसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघात भोंगरा व जाम येथे खुलेआम पैशे वाटणा-या भ्रष्टाचारी आरोपींना पाठीशी घालणे,पैशे वाटल्याचे पुरावे गायब करणे,प्रकरणांची चौकशी करण्यास दिरंगाई करणे व टाळाटाळ करणे,जाम येथील पैशे वाटल्याच्या विडीओची चौकशी न करणे,पात्र वनदावे पुन्हा अपात्र करून उपोषणकर्त्यांना शारिरीक व मानसिक त्रास देणे,वनदावेदारांना वनहक्कापासून वंचित ठेवणे,वनदावे निकाली काढण्यास दिरंगाई करणे,
राजकीय पुढा-यांचे ऐकून कामे करणे असे गंभीर आरोप शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांच्याविरोधात करण्यात आलेले आहेत. नंदूरबारचे जिल्हाधिकारी मित्ताली शेठी मॅडम ह्या शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवींवर कोणती कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
0 Comments