Advertisement

प्रांत अधिका-यांनी पुढाऱ्यांचीच गुलामी करावी,नोकरी करू नये- सुशिलकुमार पावरा

पुढा-यांच्या दबावाखाली वनदावे दडपून ठेवल्याचा आरोप

शहादा प्रतिनिधी: अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील ११ प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढा,अशी मागणी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे करण्यात आलेली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,दिलवर पाडवी,वसा वळवी,विरसिंग पवार, वनसिंग पटले,हाना पटले,धिरज पाडवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी हे पुढा-यांच्या दबावाखाली कामे करतात, पुढा-यांच्या सांगण्यानूसार कामे करतात. प्रांत अधिकारी व संबंधित लिपिक यांनी पुढा-यांच्या दबावाखाली हजारो वनदावे दडपून ठेवले आहेत. त्यांनी पुढा-यांचीच दलाली करावी,नोकरी करू नये,अशी अधिका-यांवर टिका बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केली आहे.
                       अक्राणी तालुक्यातील मौजे जुगनी येथील एकुण ११ वनदावे आपल्या कार्यालयात गेल्या १ वर्षांपासून प्रलंबित आहेत. जुगनी येथील वनदावे दारांनी आपल्याकडे वारंवार पत्र व्यवहार करून वनहक्क दाव्यांबाबत कार्यवाहीसाठी अर्ज केलेले आहेत. जुगनी येथील वनहक्क दाव्यांबाबत कार्यवाहीसाठी दिनांक १९/०७/२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे दिनांक ०८/०७/२०२४ रोजीच्या उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या पत्रान्वये दिसून येते. बैठक आयोजित करूनही सदर दाव्यांबाबत कार्यवाही प्रलंबित असल्याकारणाने दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी जुगनी येथील वनदावेदावेदार उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत,असे दिनांक १७/०९/२०२४ रोजीच्या पत्रानुसार समजते.सदर वनहक्क दावे दारांना वारंवार आपल्या कार्यालयात हेलपाटे घालायला लावून शारिरीक व मानसिक त्रास दिला जात आहे.त्यांचे वनहक्क दावे जाणीवपूर्वक संबंधित लिपिक व अधिकारी हे निकाली काढत नाहीत, असा आरोप वनदावेदारांकडून करण्यात येत आहे.म्हणून याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई करण्या-या लिपिक व अधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील एकुण ११ वनहक्क दावे तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments