Advertisement

आदिवासींची औकात काय आहे,म्हणणा-यावर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा- बिरसा फायटर्सची मागणी

पोलीस निरीक्षक शहादा यांना निवेदन 

शहादा प्रतिनिधी : आदिवासींची औकात काय आहे, असे संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक वादग्रस्त वक्तव्य करणा-या श्री. पांडूरंग मेरगळ रा.पंढरपूर जि.सोलापूर यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा ,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,विलास पाडवी ,योगेश गुलवाने, कालुसिंग भामरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                         आमचं आरक्षण आदिवासींनी पळवून नेलं,या भामट्यांनीच आमचं वाटोळ केलं,आदिवासींची काय औकात आहे हो आमच्याबरोबर लढायची,लोकसंख्यांच किती आहे त्यांची. असे संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देश जातीवाचक वादग्रस्त वक्तव्य धनगर समाजाचे व्यक्ती श्री. पांडूरंग मेरगळ रा.पंढरपूर जि.सोलापूर यांनी पंढरपूर येथे उपोषण दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे.आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक वादग्रस्त वक्तव्य करणा-या पांडूरंग मेरगळ यांचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो. पांडूरंग मेरगळ यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून संपूर्ण आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झालेला आहे.पांडूरंग मेरगळ यांनी आदिवासी समाजाबद्दल "औकात" अपशब्द वापरून आदिवासींना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासींना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.महाराष्ट्रातील विविध भागांतून या पांडूरंग मेरगळ विरोधात आदिवासी बांधवांकडून प्रशासनास निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात येत आहे.तरी पांडूरंग मेरगळ यांनी संपूर्ण आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी ,हीच नम्र विनंती.
               सद्य स्थितीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार हालचाल करत आहे.त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा खूपच तापलेला आहे.आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला आदिवासींत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, तो तात्काळ मागे घ्यावा. म्हणून महाराष्ट्र भर आदिवासी समुदायाकडून निवेदन दिली जात आहेत. अशा परिस्थितीत पांडुरंग मेरगळ यांनी आदिवासीबद्धल जातीवाचक वक्तव्य करून कायदा व सुवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे.म्हणून पांडुरंग मेरगळ यांनी संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments