शहादा प्रतिनिधी:शहादा तालुक्यातील डामरखेडा येथे दिसलेल्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय वन अधिकारी व वनक्षेत्रपाल वनविभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा ,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,कैलास बागुल, आकाश भील, विकेश पावरा,नवनाथ ठाकरे,एकनाथ भील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा,तळोदा ,अक्कलकुवा परिसरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढून मानवावर हल्ले वाढले आहे.शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील पुलावरती एक बिबट्या दिनांक १४ सप्टेंबर २०२४ शनिवार रोजी परिसरातील लोकांना दिसला आहे. बिबट्या दिसल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लोक कामासाठी घराबाहेर निघायला घाबरत आहेत. बिबट्याने या परिसरात दहशत निर्माण करून ठेवली आहे.ब-याच आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह हा शेतमजुरीवर चालतो. बिबट्याच्या भितीने शेतमजुर घराबाहेर पडायला घाबरत आहेत.
८ दिवसापूर्वी रोझवा प्लॉट ता.तळोदा येथे ४-५ वर्षीय बालिकेवर हल्ला केल्याने मृत्यू झाला.शहादा तालुक्यातील ईस्लामपूर येथे १५ दिवसांपूर्वी एका युवकाचा संशयास्पद मृतदेह शेतात सापडला.काही दिवसापूर्वी आजीसह नातूचा हल्ल्यात मृत्यू झाला.परिसरात गेल्या आठवड्याभरात बिबट्याचा हल्ल्यात तिघांच्या जीव गेला.तेव्हा तीन बिबट्या पकडण्यात आले. परंतु,त्यातील एकच बिबट्या नागपूर अभयारण्यात घेऊन गेले.पकडलेले दोन बिबट्या गेले कुठे?वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.वारंवार घडत असलेल्या दु:खद घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.भीतीमुळे शेतातील कामही होत नाही.परिसरात नागरिकांना दररोज बिबट्ये दिसत आहे.बाहेरून नरभक्षक १५ ते २० बिबटये परिसरात सोडले असण्याची शक्यता आहे.वाढते हल्ले तात्काळ रोखण्यासाठी वन विभागाने २० ते २५ पिंजरे लावून बिबट्याना पकडून लांब अभयारण्यात सोडण्यात यावे.ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे .तरी शहादा तालुक्यातील डामरखेडा परिसरातील बिबट्याला तात्काळ पकडून बंदोबस्त करावा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे.
0 Comments