Advertisement

नंदूरबारला आदिवासी विद्यापीठ स्थापन करा- बिरसा फायटर्सची मागणी

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना निवेदन 

शहादा प्रतिनिधी: नंदुरबारला आदिवासी विद्यापीठ स्थापन करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,करन चव्हाण, विलास पाडवी,मगन पाडवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                      नंदुरबार जिल्हा आदिवासी बहूल जिल्हा आहे.८० टक्के पेक्षा अधिक आदिवासी लोक या जिल्ह्यात राहतात. नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासी बांधवांचा सामाजिक विकासासाठी नंदूरबार जिल्ह्य़ात एक तरी विद्यापीठ व्हावे,अशी आदिवासी बांधवांची इच्छा आहे. नंदूरबार जिल्ह्य़ात आदिवासी विद्यापीठ सुरू झाल्यावर आरोग्य, रोजगार अनेक समस्या सुटतील. विविध विकासाच्या योजना विद्यापीठ अंतर्गत राबविता येतील. या विद्यापीठात ८० टक्के आदिवासी विद्यार्थांना व २० टक्के इतर समाजातील विद्यार्थांना प्रवेश मिळेल.म्हणून या भागात आदिवासी विद्यापीठ होणे अत्यावश्यक आहे.
आदिवासी विद्यापीठ हे नाशिक येथे स्थापन करण्याचे काम सुरू आहे.नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व आरोग्य विज्ञान विद्यापीठ अशी दोन्ही विद्यापीठे आहेत.विदर्भात आदिवासी बहूल जिल्हा म्हणून गडचिरोली येथे गोंड राजाचे नावाने गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे.त्याच पाश्र्वभूमीवर नंदूरबार येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात यावे.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे करण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments