Advertisement

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंकरपूर गावात भव्यपोळा भरला.


 यावेळी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील आबालथोर वृद्धांनी सहभाग नोंदवला. शंकरपूर गाव म्हटलं की हिंदू मुस्लिम एकोप्याची ख्याती या गावात दिसते. काल पोळा सणानिमित्त दळणवळणासाठी बाहेरगावी गेलेले सर्वच उद्योगपती हनुमान मंदिराजवळ एक वटतात. आजच्या या विज्ञान युगात शेतीसाठी अनेक जण ट्रॅक्टरचा वापर करतात पण या गावांमध्ये आजही बरेचशा उद्योजकांन कडे बैल जोडी पहावयास मिळते. त्यांच्याकडे ट्रॅक्टर घेण्याची कुवत नाही यातला भाग नाही पण भारतीय संस्कृती जपत हे शेती करतात. कालही अशाच प्रकारे सर्व गावकऱ्यांनी आपापले बैलजोडी पुजून व बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलपोळा साजरा केला.पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे पोळा.दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात.बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.आजही हीच परंपरा शंकरपूर गावातील पोळ कुटुंबीयांनी जपली आहे

       मा.शंकरसिंग ठाकुर
सहसंपादक ( Indian Tribal News)

Post a Comment

0 Comments