Advertisement

शहाद्यात ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा,सांस्कृतिक मिरवणूक ठरली लक्षवेधी

शहादा प्रतिनिधी: ९ ऑगस्ट २०२४ रोजी विश्व आदिवासी दिनानिमित्त क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशिय संस्था शहादा,बिरसा फायटर्स जिल्हा नंदूरबार ,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा नंदूरबार तर्फे शहादा शहरात सांस्कृतिक मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.या मिरवणुकीची सुरुवात क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथे आदिवासींची कुलदैवता याहा मोगी माता,राणीकाजल माता,क्रांतिवीर बिरसा मुंडा,क्रांतिकारक खाज्या नाईक,तंट्या मामा भील, वीर एकलव्य यांच्या प्रतिमेला हार, पुष्प अर्पण करून,धरतीमाता पूजन करून करण्यात आली.क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी,जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष डाॅ.सुरेश नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी तानाजी खर्डे , क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष सुनिल सुळे,बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, क्रातिवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशिय संस्था उपाध्यक्ष प्रा.अशोक वळवी ,उपसरपंच नागझिरी सचिन पावरा ,उपसरपंच कमल डुडवे ,जितुभाऊ जमदाडे नगरसेवक,वकिल डाॅक्टर ,शिक्षक,कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच शहादा तालुक्यातील गणोर,शहाणा,वडगांव, लोणखेडा,इत्यादी गांवांतून आलेले असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.यावेळी क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथे येत्या बिरसा मुंडा जयंतीला क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल व लवकरच स्मारक होईल, असे आश्वासन आमदार राजेश पाडवी यांनी दिले.क्रांतिवीर बिरसा मुंडा की जय,वीर एकलव्य की जय,याहा मोगी माता की जय,९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा ,विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
             छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सांस्कृतिक मिरवणूक निघाली. या मिरवणूकीत क्रांतिवीर बिरसा मुंडाची भूमिका कुणाल भंडारी व हॅरी पावरा यांनी साकारली तर विर एकलव्यची भूमिका संजीव भंडारी त्याचबरोबर राणी झलकारीबाईच्या भूमिकेत परी पावरा यांनी आपली झलक दाखवली.आदिवासी पुरूषांनी धोतर, पगडी नेसत हातात तीर कमठा, धनुष्य बाण,धा-या इत्यादी पारंपरिक हत्यारे मिरवणूक मिरवली तर महिलांनी नऊवारी साडी, नाटी,बाट्ट्या, वाला,पायला, हाकुल इत्यादी दागिने परिधान करत नाच केला. ढोल वाजवून नाचत गाजत शहादा शहरात मिरवणूक निघाली. ९ आॅगष्ट जागतिक आदिवासी दिनाचे प्रस्तावना करुन क्रातिवीर बिरसा मुंडा चौक शहादा येथे क्रातिवीर बिरसा मुंडा यांचे स्मारक झाले पाहिजे त्याकरिता सर्व लोकप्रतिनिधी व समाजाने सहकार्य करण्याचे आव्हान सुनिल सुळे क्रातिवीर बिरसा मुंडा स्मारक सस्थेचे अध्यक्ष यांनी केले 
                   आजची आमची तरूण पिढी आपली आदिवासींची संस्कृती विसरत चालली आहे.पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करू लागली आहे.भावी पिढीने आदिवासींची संस्कृतीची जोपासना केली पाहिजे.संपूर्ण जगाला आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी ही सांस्कृतिक मिरवणूक आम्ही काढली आहे,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली.डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास हार अर्पण करून मिरवणूकीचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments