Advertisement

नाशिक येथील जन आक्रोश मोर्चात बिरसा फायटर्सचा ऊलगुलान!


नंदूरबार मधील आमदार, खासदार आले नाहीत म्हणून निषेध

नंदूरबार प्रतिनिधी: पेसा पदभरतीच्या मागणीसाठी दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी नाशिक येथील आदिवासींच्या जन आक्रोश मोर्चात बिरसा फायटर्सच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन ऊलगुलान केला.बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांनी  क्रांतिवीर बिरसा मुंडांचे रूप धारण मोर्चात पुढाकार घेतला.मोर्चात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,राज्य सचिव संजय दळवी,नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते,
सोमनाथ पावरा,वडगांव चे अध्यक्ष राहुल चव्हाण, विष्णू डुडवे,तितरीचे अध्यक्ष रवींद्र पावरा,गोविंद पावरा,पप्पू आर्या,अभय पावरा आदि कार्यकर्ते नंदूरबार, धुळे,नाशिक, ठाणे या भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेत. पेसा भरती झालीच पाहिजे,आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे,शिंदे सरकार होश में आवो,आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा,बिरसा करे ऊलगुलान, हम अपना हक मांगते नही किसीसे भीख मांगते,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.हा मोर्चा तपोवन मैदान, औरंगाबाद नाका,निमाणी, मालेगाव स्थानक ,रविवार कारंजा,रेड क्रॉस सिग्नल, शालिमार, सीबीएस ते जिल्हाधिकारी कार्यालय- आदिवासी विकास भवन नाशिक पर्यंत काढण्यात आला.मोर्चात लाखोंच्या संख्खेने आदिवासी बांधव उपस्थित होते. दिनांक  १२ ऑगस्ट २०२४ रोजी पेसा भरतीच्या मागणीसाठी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालय व आदिवासी विकास भवन समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते,तेव्हाही बिरसा फायटर्सचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलन सहभागी झाले होते.
                      पेसा भरतीच्या नाशिक येथील जन आक्रोश मोर्चात नंदूरबार जिल्ह्य़ातील एकही आमदार, खासदार सहभागी झाले नाहीत, म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. जोपर्यंत पेसा भरती सरकार करत नाही,तोपर्यंत पेसा क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये बंद करा,ग्रामपंचायत बंद करा,पेसा कायदा वाचवा.उठ आदिवासी जागा हो,पेसा कायदा वाचवण्याचा धागा हो! असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments