Advertisement

वनकर्मचारीच बनले वनभक्षक,६०० आंब्यांची झाडे उपटली;गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

तळोदा प्रतिनिधी: समर भीलजी पावरा रा.धजापाणी ता.तळोदा यांच्या वनजमीनीतील शेतातील ६०० आंब्याची झाडे उपटून नुकसान करणा-या वनखात्यातील संबंधित कर्मचाऱ्यांवर वनकायद्यानुसार गुन्हे दाखल करून तात्काळ सेवेतून निलंबित करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन वनक्षेत्रपाल वनविभाग तळोदा,तहसीलदार तळोदा,पोलीस निरीक्षक तळोदा व उप वनसंरक्षक तळोदा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य महासचिव बारक्या पावरा,जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे ,जिल्हा सल्लागार डोंगरसिंग पावरा मालदा ग्रामपंचायत सरपंच गोपीनाथ पावरा,समर पावरा ,बेताब पावरा, टेट्या पावरा, रायसिंग पावरा, वनकर पावरा,ओजा-या पावरा,वसंत पावरा,रूचण्या पटले,भाईदास पटले,पिंट्या पावरा,हिंमत पावरा,लालसिंग पावरा,भाईदास पावरा,विजेय पावरा,मगन ठाकरे,चमार पावरा,फेका पावरा,कुशाल पावरा,दिलीप वळवी,गुलाब पावरा,विजेय मावसी* आदि कार्यकर्ते उपस्थित होते .
                      समर भीलजी पावरा रा.धजापाणी ता. तळोदा यांच्या वनजमीनीतील (शेतातील) एकुण ६०० आंब्याची झाडे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना अथवा नोटीस न देता अपूर्णा लोहारे वनपाल, लक्ष्मी मोते वनरक्षक, विरसिंग पावरा वनरक्षक, महेंद्र तडवी,आशोतोष वनरक्षक यांनी ३ वर्षांची झाडे उपटून प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.वनविभागामार्फत झाडे लावा ,झाडे जगवा असा संदेश दिला जाते.वनविभाग हे झाडांचे संरक्षण करण्यासाठी आहे.परंतु सदर वनविभागातील कर्मचाऱ्यांनी झाडे उपटून गैरकृत्य केलेले आहे. आपल्या मनमानीपणे एवढी मोठी झाडे उपटून वनविभागाला कलंकित केले आहे.म्हणून सदर कर्मचाऱ्यांवर वनकायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच झाडांचे नुकसान करून गैरकृत्य केल्याप्रकरणी तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे.तसेच संबंधित शेतक-यांची उपटलेली ६०० झाडे जशीच्या तशी लावून मिळावीत ,झालेल्या नुकसानीचे भरपाई देण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून आपल्या कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल. याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments