Advertisement

५ वर्षे मंजूर वनदाव्यांच्या फाईल्स दडपून ठेवणा-या हर्षल सोनार जिल्हा समन्वयकाला सेवेतून काढून टाका,बिरसा फायटर्सची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नंदुरबार प्रतिनिधी: तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील २१ मंजूर वनदावे पैशांच्या अपेक्षेने तब्बल ५ वर्षे दडपून ठेवणा-या श्री.हर्षल सोनार, जिल्हा समन्वयक, वनजमीन शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना सेवेतून तात्काळ काढून टाका,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,आकाश तडवी,भावसार मोते,रवींद्र नावडे आदींच्या सह्या आहेत. 
                दिनांक ३१/०५/२०१९ रोजीच्या जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत २१ वनदावे मंजूर करण्यात आले होते तसे वृत्तपत्रात देखील बातमी आली होती म्हणून त्या मंजूर वनदाव्यांची प्रमाणपत्रे संबंधित दावेदार यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मा.जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिनांक०२/०८/२०२४ रोजी देण्यात आले.सदर मंजूर वनदाव्यांची सखोल चौकशी केली असता तसेच संबंधित दावेदार यांनी वारंवार भेटुन विचारणा तपासणी केल्यावर त्यांची बोलण्याची भाषा आणि त्यांच्या वर्तनावरुन असे लक्षात आले की, श्री.हर्षल सोनार, जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा यांनी वनदावेदारांकडून पैसे मागणी केल्याने पैसे दिले नाहीत म्हणून वारंवार खोटे सांगून वेळ घेतला आणि आम्हाला जाणीवपूर्वक इतके वर्ष या कर्मचारी ने मानसिक त्रास दिला आहेत .मंजूर वनदाव्यांच्या फाईल्स तब्बल ५ वर्षे दडपून ठेवल्या.या ५ वर्षाच्या कालावधीत श्री.हर्षल सोनार यांनी संबंधित दावेदारांना जिल्हा कार्यालयात वारंवार हेलफाटा मारायला लावल्या,५ वर्षे आदिवासी बांधवांच्या भावनांची खेळ केला, प्रधानमंत्री किसान सन्मान योजने सारखे अनेक विविध शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागले आहेत. आदिवासी बांधवांना फसवले.सदर मंजूर वनदाव्यांची प्रमाणपत्रे देण्याच्या कामी श्री.हर्षल सोनार यांनी हलगर्जीपणा करून पैशांच्या अपेक्षेने कर्तव्यात कसूर केलेली आहे.अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे वनदावेदारांचे हजारों वनदावे प्रलंबित आहेत. तसेच नंदुरबार जिह्यातील प्रत्येक तालुक्यातुन अनेक नागरिकांच्या यांचा विरोधात संघटनेला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत म्हणून प्रशासनावर वनदावेदारांचे आरोप होतात. श्री.हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा यांच्या बेजबाबदारपणामुळे हजारों वनदावे प्रलंबित असून दावेदारांचा प्रशासनावर अविश्वास निर्माण होत आहे.म्हणून श्री.हर्षल सोनार, जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा यांना तातडीने पदावरून काढून टाकण्याची कारवाई करावी,अन्यथा याविरोधात १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनी बिरसा फायटर संघटना पुर्ण ताकदीने तीव्र आंदोलन छेडणार आहोत, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments