Advertisement

रस्ता,पाणी,वीज,अंगणवाडी,शाळा, वनदाव्यांच्या मागणीसाठी बिरसा फायटर्सचे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आंदोलन

 नंदूरबार प्रतिनिधी: तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील २१ मंजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्र मिळावेत,गांवात रस्ता,पाणी,वीज,अंगणवाडी ,शाळा याची सोय करावी ,या मागणीसाठी १५ ऑगस्ट २०२४ रोजी बिरसा फायटर्सचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन होणार आहे.आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांना देण्यात आले आहे.निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,वनसिंग पटले,भोंडा पटले,किसन वसावे,दिनेश वळवी,हाना पटले,सुनील वसावे,जयसिंग वळवी,माधव वसावे आदि कार्यकर्ते नंदूरबार येथे उपस्थित होते. 
                           बिलीचापडा गांवातील एकूण २१ मंजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्र मिळणेबाबतचे निवेदन मा.उपविभागीय अधिकारी तळोदा यांना बिरसा फाइटर्स नंदूरबार संघटनेकडून दिनांक १५/०४/२०२४ रोजी देण्यात आले.त्यानुसार मा.उपविभागीय अधिकारी तळोदा यांनी मा.जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिनांक १९/०४/२०२४ रोजीच्या पत्रानुसार सदर मंजूर वनदावे तळोदा येथे प्राप्त नसल्याचे म्हटले आहे.उपविभागीय अधिकारी तळोदा कार्यालयातून प्राप्त यादीनुसार सदर वनदावे दिनांक ३१/०५/२०१९ रोजी वाटप केल्याचे नमूद करण्यात आले आहे.एका जनहित याचिकेवर निर्णय देताना मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ३० जानेवारी २०१९ रोजी जिल्हास्तरीय वनहक्क समितीला वनसिंग राशा पटले आणि इतर २१ व्यक्तींच्या वनहक्क दाव्यांबाबत चार महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या उपस्थितीत २३ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत दाव्यांची पुनर्रपडताळणी करण्याचे निर्देश उपविभागीय स्तरीय समितीस दिले होते. त्यानुसार उपविभागीय स्तरीय तळोदा येथील समितीने दाव्यांची पनर्रपडताळणी करून सदर दावे अंतिम निर्णयासाठी जिल्हास्तरीय समितीकडे सादर केले होते. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत २१ वनदावे मंजूर करण्यात आले होते. त्या मंजूर वनदाव्यांची प्रमाणपत्रे दावेदारांना तात्काळ देण्यात यावी.गांवात रस्ता,पाणी,विज, अंगणवाडी,शाळेची सोय करण्यात यावी,या मागणीसाठी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments