शहादा प्रतिनिधी: डाॅ.राजेंद्र भारूड, आयुक्त, आदिवासी विकास व संशोधन प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्यावर खोटी तक्रार दाखल करणा-यांवर,शासकीय कामांत अडथळा निर्माण करत दबाव आणणा-यांवर कायदेशीर कारवाई करा,नांदेड येथे जोडो मारो आंदोलन करणा-यांचा जाहीर निषेध करीत आहोत, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आयुक्त डाॅ.राजेंद्र भारूड,आमदार किरण लहामटे व लकी जाधव यांचे समर्थक करीत आहोत, अशा आशयाचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अजित पवार यांना तहसीलद शहादामार्फत देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनांक ०६/०८/२०२४ रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मूळ आदिवासी व मल्हार कोळी,टोकरे कोळी,महादेव कोळी बांधवांची बैठक सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली.या बैठकीत डाॅ.राजेंद्र भारूड यांनी प्रशासनातर्फे खरी बाजू मांडली असता उपस्थित मल्हार कोळी,टोकरे कोळी,महादेव कोळी यांच्या नेत्यांनी,आमदारांनी सभेत गोंधळ घातला व अनुसूचित जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र मिळणेसाठी डाॅ.राजेंद्र भारूड यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.टोकरे कोळी,मल्हार कोळी,महादेव कोळी तर्फे बाजू मांडणा-या लोकांनी डाॅ.राजेंद्र भारूड बद्धल आक्षेपार्ह वक्तव्य केले.मूळ आदिवासी कोण व खोटे आदिवासी कोण यातील फरक मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपलब्ध पुराव्याद्वारे,कागदोपत्राद्वारे समजल्यामुळे बैठक गुंडाळण्यात आली.त्या बैठकीत डाॅ.राजेंद्र भारूड व मूळ आदिवासींची बाजू मांडणा-यां वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.
ऊल्टा चोर कोतवाल को ही डांटे या प्रमाणे डाॅ.राजेंद्र भारूड यांच्याविरुद्ध जळगाव येथे दिनांक ०९/०८/२०२४ रोजी प्रवर्तन बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाठ यांनी पोलीस अधिक्षक जळगाव यांना भेटून ऑनलाईन खोटी तक्रार केल्याचे वृत्त समजते.यावेळी मंगला सोनवणे,मदन शिरसाठ, तुषार सैंदाणे,पंकज सोनवणे,भगवान सोनवणे,दिप्तेश सोनवणे,विशाल सपकाळे,ॠषीकेश सोनवणे,संदीप कोळी,बाळासाहेब सैंदाणे,पंकज रायसिंग, दिपक तायडे,गुलाबराव बाविस्कर, लीलाधर कोळी,डीगंबर सोनवणे,निखिल सपकाळे,जयेश कोळी,सुभाष सोनवणे आदि उपस्थित होते.डाॅ.राजेंद्र भारूड हे शासकीय अधिकारी आहेत, त्यांनी प्रशासनाची बाजू मांडून चांगले काम केले आहे,काहीही गैर केले नाही.डाॅ.राजेंद्र भारूड विरूद्ध केलेली तक्रार ही निराशेपोटी,डाॅ.राजेंद्र भारूड यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासाठी,दबाव आणण्यासाठी, मूळ आदिवासींचे हक्क हिरावण्यासाठी जाणीवपूर्वक करण्यात आली आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ , डाॅ.राजेंद्र भारूड,किरण लहामटे, लकीभाऊ जाधव यांचे नांदेड येथे बॅनर लावून जोडे मारो आंदोलन करणा-यांचाही आम्ही निषेध व्यक्त करतो.मूळ आदिवासींची बाजू मांडणा-याविरोधात जोडो मारो आंदोलनामुळे मूळ आदिवासींच्या भावना दुखावल्या असून तीव्र संताप निर्माण झाला आहे.मूळ आदिवासींची बाजू मांडणारे हे एकटे नाहीत तर यांच्यासोबत संपूर्ण मूळ आदिवासी समाज आहे.जोडो मारो आंदोलनाद्वारे आदिवासी समाजात तेढ निर्माण करणे,मूळ आदिवासींना भडकावणे,आदिवासींची बाजू मांडणा-याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे,प्रशासकीय अधिका-यांवर दबाव आणून शासकीय कामांत अडथळे निर्माण करणे,कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणे,असे गैरकृत्य जोडो मारो आंदोलन कर्त्यांकडून व खोटी तक्रार दाखल करणाऱ्यांकडून झाले आहे.म्हणून डाॅ.राजेंद्र भारूड यांच्याविरुद्ध जळगाव येथे खोटी तक्रार करणाऱ्यांविरुद्ध व नांदेड येथे जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची शासनाने नोंद घ्यावी.असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.
0 Comments