Advertisement

कला ,क्रीडा व संगणक शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या- बिरसा फायटर्सची मागणी

शिक्षकांच्या अन्नत्याग उपोषणास दिला पाठिंबा

शहादा प्रतिनिधी: शासकीय आदिवासी आश्रम शाळेत कला,क्रीडा व संगणक शिक्षकांना पुननिर्युक्ती देऊन कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अजित पवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, विभागीय आयुक्त नाशिक, आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक, जिल्हाधिकारी नाशिक यांना तहसीलदार शहादा जि.नंदुरबार मार्फत देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,सोमा पावरा,राहुल पावरा,राजू पावरा, प्रकाश चव्हाण, जयसिंग पावरा,भाईदास पावरा,मुकेश पावरा,बायटीबाई पावरा,जशीबाई पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
               शासकीय आदिवासी आश्रमशाळेत कला,क्रीडा व संगणक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी,या मागणीसाठी दिनांक १२ ऑगस्ट २०२४ पासून गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे महाराष्ट्र राज्य, आदिवासी विकास विभाग कंत्राटी कला,क्रिडा व संगणक शिक्षक कृती समितीतर्फे शिक्षकांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलेले आहे.त्या उपोषणास आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर सक्रिय पाठिंबा देत आहोत.आदिवासी विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत कंत्राटी कला,क्रीडा व संगणक पदभरती सन २०१८ व २०२९ मध्ये राबविण्यात आली होती. या पदभरतीत एकूण १५०० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. या शिक्षकांनी आपल्या अध्यापनाच्या जोरावर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रात राज्यात डंका गाजवला होता. आतापर्यंत शिक्षकांना एप्रिल २०२३ पर्यंत ५ वर्षे शिक्षकांना नियुक्तीचे आदेश मिळाले.परंतु सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षांत १ वर्षापेक्षा अधिक कालावधी ऊलटून गेला तरी नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. राज्यभरात शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.
                     सरकारला कला,क्रीडा व संगणक शिक्षकांची गरज नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.विद्यार्थांच्या शैक्षणिक नुकसानाला आदिवासी विकास विभाग जबाबदार आहे.अनेक शिक्षक हे मोठ्या पगाराची नोकरी सोडून शासकीय आश्रमशाळेत नोकरीला लागले. पुनर्नियुक्ती आदेश न मिळत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.म्हणून नव्याने बाह्य स्रोत पद्धतीने पदभरती न करता पहिले काम केलेल्या कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना प्राधान्य देऊन त्यांना सेवेत कायम करावे व तसे नियुक्ती आदेश द्यावेत. हीच नम्र विनंती. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments