Advertisement

ये आजादी झूठी है नारा देत बिरसा फायटर्सचे आदिवासींच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन*

नंदूरबार प्रतिनिधी: ये आजादी झूठी है! घोषणा देत बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील २१ मंजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्र तात्काळ मिळावेत.जन्म मृत्यू नोंद करावी.पाणी,रस्ता,वीज,शाळा,अंगणवाडी, इत्यादी मूलभूत सुविधा मिळाव्यात. बिलीचापडा येथील २१ वनदावे फाईल्स पैशांच्या अपेक्षेने तब्बल ५ वर्षे दडपून ठेवणा-या श्री.हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून काढून टाका.शहादा तालुक्यातील शहाणा,वडगांव, कोडपांढरी, चांदसैली,लंगडी, गोटाळी, मलगांव, भुलाणे,सटीपाणी,आबणपुरा,भोंगरा, दुधखेडा, नवानगर, नवागाव ,कंसाई, नागझिरी, करडे,मानमोडे, राणीपूर इत्यादी १५ गांवाचे प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढावेत. या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांनी मागण्यांचे निवेदन प्रत्यक्षात स्वीकारले.बिलीचापडा येथील वनदाव्यांवर कलेक्टर यांची सही झाली आहे, वनदावे मंजूर करण्यात आले आहेत, वनपट्टा प्रमाणपत्रे लवकरच देऊ,हर्षल सोनार जिल्हा समन्वयक यांची चौकशी लावू,जन्म मृत्यूची नोंदसाठी निर्देश देण्यात येतील. शाळा ,अंगणवाडी वीज,पाणी,रस्ता,इत्यादीबाबत कार्यवाही सुरू करू.शहादा तालुक्यातील १५ गांवातील वनदाव्यांबाबत दिनांक १९ ऑगस्ट २०२४ सोमवार रोजी बैठकीत निर्णय घेवू,असे सांगत जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी आश्वासन दिले व प्रशासन सहकार्य करावे,असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
                 या आंदोलनात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,रमेश पटले,आकाश तडवी,दिपक तडवी,प्रकाश पावरा,अर्जून पावरा,चंपालाल पावरा,
बिलीचापडाचे वनसिंग पटले,किसन वसावे सह असंख्य महिला भगिनी तसेच शहादा तालुक्यातील शहाणा,वडगांव, नवागाव इत्यादी गांवातील असंख्य आदिवासी बांधव सहभागी झाले.ये आजादी झूठी है आदिवासी जनता भूखी है,जय जोहार का नारा है भारत देश हमारा है,वनदाव्यांचे प्रमाणपत्र तात्काळ द्या,वनदावे निकाली काढा नाहीतर खुर्च्या खाली करा,जंगल जमीन कुणीन से आमरी से आमरी से,जंगल जमीन की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे,कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय,हर्षल सोनार वर कारवाई करा,लढेंगे जितेंगे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments