Advertisement

पोलिस पाटीलला गावबंदी;बोरमळी गांवात दडपशाही;पाटलासह कुटुंबातील ७ जणांना गावाबाहेर काढले

गांवगुंडांना कायमस्वरूपी जेलमध्ये टाका- बिरसा फायटर्सची मागणी

 शहादा प्रतिनिधी: बोरमळी तालुका चोपडा येथील नवनिर्वाचित पोलीस पाटील संजय नारायण पावरा सह कुटुंबातील ७ जणांना जबरीने गावाबाहेर काढणा-या बाबुराव बुटा पाडवी व त्यांच्या सहका-यांवर गुन्हा दाखल करून अटक करून कायमस्वरूपी जेलमध्ये जेरबंद करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांच्यामार्फत देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते ,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                             बोरमळी तालुका चोपडा जिल्हा जळगाव या गावाचे नवनिर्वाचित पोलीस पाटील संजय नारायण पावरा व त्यांच्या कुटुंबातील ७ जणांना बाबुराव बुटा पाडवी यांनी पोलीस पाटीलचा मान दुसर्‍या उमेदवाराला मिळाला,याच राग धरून दमदाटी व जबरदस्तीने गावाबाहेर काढत गांवबंदी केली आहे.सदर घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.या गावातील बाबूराव बुटा पाडवी यांच्याकडे दोन पिढ्यांपासून वंशपरंपरागत पाटीलकी होती.ऑगस्ट २०२३ मध्ये जिल्हा प्रशासनाने पुन्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबविली.या भरती प्रक्रियेत सर्वाधिक गुण मिळणाऱ्या संजय नारायण पावरा यांची बोरमळी गावाच्या पोलीस पाटील पदावर नियुक्ती करण्यात आली. ही गोष्ट सहन न झालेल्या बाबुराव पाडवी व त्यांच्या सहका-यांनी संजय पावरा यांच्या घरातील सामानाची मोडतोड केली.शेतीसाहित्यासह बैलजोडी विकून टाकली. पीकही कापून नेले.संजय पावरा यांच्या आई वडील, भाऊ, काका,काकूंसह ७ जणांना गावाबाहेर हाकलून लावले. 
                         याबाबत संजय पावरा यांनी अडावद पोलीस ठाण्यात व तालुका प्रशासनाकडे दाद मागितली.परंतु पोलिसांकडून व तालुका प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही.म्हणून सदर पोलीस पाटील व त्यांचे कुटुंबीय इकडेतिकडे उदरनिर्वाहासाठी भटकत आहेत. गांवगुंडांच्या या गुंडागर्दीपुढे पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे का? भारत देशात लोकशाही सुरू आहे.अशा प्रकारची दडपशाही खपवून गेली जाणार नाही. तरी या प्रकरणातील संशयित आरोपी बाबुराव बुटा पाडवी व त्यांच्या सहका-यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी जेलमध्ये जेरबंद करण्यात यावे व नवनिर्वाचित पोलीस पाटील संजय नारायण पावरा यांना पोलीस पाटील पदावर काम करण्यास संरक्षण देण्यात यावे .त्याचबरोबर त्यांची शेतजमीन, घर,घरातील सामान,पशुधन परत मिळवून द्यावे.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments