Advertisement

15 ऑगस्ट निमित्त राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत एन एस एस स्वयंसेवकांनी केले श्रमदान व एक पेड माँ के नाम उपक्रमाचे उदघाटन

मोराणे :- प्रतिनिधी 

मोराणे :- दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजना, विभाग अंतर्गत समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, ता. जि. धुळे येथील एन. एस. एस. चे स्वयंसेवकांनी आज भागाबाई आनंदा वाघ आश्रमशाळा परिसरात आणि समाजकार्य महाविद्यालय परिसरात श्रमदान करण्यात आले. 
श्रमदान करण्याची वेळ दुपारी 12 : वाजता ते 1: 30 वाजता या दरम्यान श्रमदान केले होते. महाविद्यालयातील मैदान स्वच्छता करण्यात आले होते. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. विष्णू गुंजाळ यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम उपक्रमाचे उद्धघाटन करून झाडे लावण्यात आली. त्यानंतर महाविद्यालय परिसरात झाडे लावले होते. 
राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत एन एस एस च्या स्वयंसेवकांना महाविद्यालय मार्फत अल्पआहार सर्व स्वयंसेवकांना देण्यात आला. 
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. विष्णू गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी. प्रा. डॉ. राहुल आहेर, विद्यार्थी विकास अधिकारी. प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे, प्रा. डॉ. सुदाम राठोड, राष्ट्रीय सेवा योजना सहायक कार्यक्रम. अधिकारी. प्रा. डॉ. फरीदा खान, व एन एस एस चे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments