Advertisement

आज शासकीय आश्रम शाळेच्या रिक्त जागेवर वृक्षलागवड कार्यक्रम करताना शाळेचे विद्यार्थी व शिक्षक ग्रामस्थ

शहादा (शहाणा) वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम अनेकजण करतांना आपण पाहतो, पण वाढदिवसाच्या निमित्ताने त्या व्यक्तीच्या हस्ते वृक्षलागवड करून त्यांच्या वया इतके वृक्ष लागवड करण्याचा पर्यावरण पूरक संकल्प सोडण्याचा अनोखा निर्णय बिरसा फायटर्सचा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांनी शासकीय आश्रम शाळेच्या रिक्त जागेवर वृक्षलागवड कार्यक्रम करताना शाळेचे विद्यार्थी व शिक्षक ग्रामस्थ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेत नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
शहादा तालुक्यातील शहाणा गावात,येथे बर्डीपाडा म्हणून गाव असलेले या गावात बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष मा.गोपाल भंडारी यांचा आज वाढदिवस होता. शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोपाल भंडारी यांचा वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहेत. शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करून भंडारी यांचा ३३ वा वाढदिवस साजरा केला आणि पुढच्या वाढदिवसा पर्यंत त्यांच्या वाढदिवसा इतके म्हणजे २०/२५ वृक्ष लागवड करून ते जगवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.गोपाल भंडारी हे वृक्षप्रेमी असल्याने शाळेचे मुख्याध्यापक मोते सर,बंसी भंडारी सर,गोपाल भंडारी,धनायुष भंडारी, दिपक तडवी,भाऊसर मोते,आकाश तडवी, कुर्बान भंडारी,पो.पाटील,पप्पु आर्य,गणेश खर्डे,निकुम सर,नन्नु भंडारी ,राकेश,मोरे, रोहित भंडारी, सोमा सुळे,सचिन भंडारी,वाहर्या सुळे व विध्यार्थी मंडळी व ग्रामस्थ परिवाराने हा
स्वागतार्ह निर्णय घेतला. ग्रामस्थ व सहकाऱ्यांच्या अशा निर्णयामुळे पर्यावरण वाढीस आपसूकच मोठा हातभार लागणार असल्याने, असे वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरे झाले तर वाढदिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होईल असा विश्वास मुख्याध्यापक मोते सर यांनी यावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments