Advertisement

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा बिरसा फायटर्सने केला निषेध!

धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याची लोकसभेत केली होती मागणी

शहादा प्रतिनिधी: धनगर समाजाला आदिवासी समाजात आरक्षण द्या, अशी मागणी लोकसभेत करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व धनगर समाजाला आदिवासींत आरक्षण देवू नका,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.निवेदन देते वेळी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, आकेश पावरा, मिथुन पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.                      आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक असून त्यात कोणत्याही अन्य समाजाची घुसखोरी आम्हाला मान्य नाही.धनगर समाजाला आदिवासी समाजात आरक्षण द्या, अशी मागणी नुकतेच लोकसभेत करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत.धनगर समाजाला आदिवासींत आरक्षण देण्यात येवू नये.धनगर समाजाला ३.५ टक्के आरक्षण शासन देत आहे.तरी काही धनगर नेते व संघटना तसेच काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे सारखे लोकप्रतिनिधी हे धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण द्या, अशी असंंवेधानिक मागणी करत आहेत.धनगर समाज व आदिवासी समाज हे दोन वेगवेगळे समाज आहेत. आदिवासींची स्वतंत्र संस्कृती आहे. ती धनगर समाजाशी मिळतीजुळती नाही. धनगर हे आदिवासी नाहीत, म्हणून आदिवासींचे आरक्षण हे धनगर समाजाला देता येणार नाही, असा स्पष्ट अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने दिलेला आहे. 
                  आदिवासी समाजाला ख-या अर्थाने ७ टक्के आरक्षण अद्याप मिळालेलेच नाही.कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासींची,बोगस आदिवासींची घुसखोरी झालेली आहे.खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रांआधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या लाखो नोक-या हडप केल्या आहेत.७जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून,राज्यात हजारो बोगस जमात चोर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर,असंवैधानिक सेवासंरक्षण देण्याचा येत आहे.आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासी लोकांनाच मिळाले पाहिजे.म्हणून आदिवासींचे आरक्षण हे धनगर समाजाला देण्यात येवू नये.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments