Advertisement

शहादा व तळोदा तालुक्यातील वनदावे निकाली काढा,अन्यथा आंदोलन- बिरसा फायटर्स

शहादा प्रतिनिधी- शहादा व तळोदा तालुक्यातील गांवांचे प्रलंबित वनदावे निकाली काढा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,आकेश तडवी,शांतीलाल पावरा,जागत्या नाईक, वालसिंग पावरा,दुरसिंग पावरा,देवजी नाईक, रवींद्र चव्हाण, राकेश मोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे शहादा व तळोदा तालुक्यातील अनेक गांवातील वनदावे प्रलंबित आहेत. शहादा व तळोदा तालुका येथील एकुन ४७ गावाचे वनपट्टा प्रलंबित दावे आहेत.तरी तहसिल कार्यालय शहादा,तळोदा व प्रांत कार्यालयात, फारेस्ट आफिस व जिल्हास्तरीय व आयुक्त कार्यालयात वनदावे प्रलंबित आहेत .तरी प्रशासनाने दुर्लक्षित केलेलं आहे.
               शहादा तालुक्यातील शहाणे, वडगाव, भुलाणे, मलगाव, नवानगर, लंगडी,गोटाळी, सटिपाणी,आबणपुरा, मानमोड्या, दुधखेडा, उभादगड, भोंगरा, चांदशैली, घोडलेपाडा, नागझरी, नांद्याकंसाई, एवढे गावातील फाईल अजुन ऑफिसमध्ये चक्रा मारत आहे . शहाणे गावातील ९ महिने झाले आहेत तरी आयुक्त कार्यालयात दाव्याची दखल घेतली नाही. ६ महिनेपूर्वी जिल्हासमिती कडे सुनावनी झाली असुन त्या दावे सुद्धा पेन्डिंग आहेत. तहसील कार्यालयात व प्रांत कार्यालयात असेच दावे पडलेले आहेत. एकुण शहादा व तळोदा तालुक्यातील ५ हजार दावे प्रलंबित आहेत .तरी शहादा व तळोदा तालुक्यातील वनदावे त्वरित निकाली काढण्यात यावेत, हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments