Advertisement

एकलव्य आदिवासी परिषदेकडून दोन जीव वाचवणाऱ्या ताराबाई पवार या वीर शबरी माता या पुरस्काराने सन्मानित


कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बहुजन समाजातील युवा नेतृत्व एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य,बहुजन टायगर फोर्स संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली आज शूरवीर धैर्यशाली ताराबाई पवार,त्याचे पती छबू पवार यांना मंजूर ग्रामपंचायत येथे जाऊन सन्मानचिन्ह, पुरस्कार, शाल श्रीफळ, साडी, आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी एकलव्य आदिवासी परिषद,बहुजन टायगर फोर्सचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते तर शेतकरी संघटनेचे शंकर अण्णा पटांगरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे,किसन सोनवणे, बहुजन टायगर फोर्सचे सागर गांगुर्डे, अरुण मोकळ, कैलास पवार, मानव अधिकार चे मोतीराम निकम ,सुनील मोकळं, प्रगतशील शेतकरी कैलास कदम, तालुका प्रमुख अविनाश कांबळे, नवनाथ वाघ,राजू वाघ, पलू मोकळं,गोपीनाथ वाघ,अरुण खुरस्ने, नाथा पवार,दगडु जाधव,खंडू बर्डे ,बंडू जाधव,नाना वाघ,अनिल वाघ तसेच मंजूर गावचे तलाठी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 याप्रसंगी मंगेश औताडे म्हणाले की ताराबाई पवार व त्यांचे पती छबू पवार व त्यांची मुलगी यांनी तीन युवक गोदावरी पात्रात वाहून जात असताना जे धाडस दाखवलं तसेच ताराबाई हिने स्वतःच्या अंगावरील साडी काढून त्या साडीच्या साह्याने गोदावरी पात्रात उडी टाकून टांगतोडे नामक दोन युवकांना जीवदान दिले हा क्षण जीवनामध्ये अविस्मरणीय क्षण असून याची दखल प्रशासनाने तात्काळ घेण्याकरता आम्ही सोशल मीडिया प्रशासन दरबारी संघटनेच्या मार्फत आवाज उचलला होता तसेच मीडियाने तात्काळ आवाज उचलल्यानंतर या कर्तृत्वान महिलेला तालुक्यातील प्रतिनिधी आजी माजी आमदार यांनी भेट देऊन कौतुक सन्मानित केले ही अतिशय प्रेरणादायक बाब आहे, परंतु ताराबाई पवार यांना शासनाने तात्काळ घरकुल द्यावे, प्रशासकीय यंत्रणेने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून यांना आर्थिक सहाय्यक तसेच शौर्य पुरस्काराने सन्मानित करावे,तर मोतीराम निकम म्हणाले की आज ताराबाई यांचे कौशल्य पाहून मंगेश औताडे यांनी सदर घटनेचा आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून उचलून ताराबाई या महिलेला कौशल्याचे फळ द्यावे यासाठी मागणी केली होती अशा सामाजिक कार्यकर्त्यासोबत आम्ही तटस्थ उभे आहोत याचा आम्हाला अभिमान आहे तसेच शंकर अण्णा फटांगरे, मंजूर गावचे सरपंच तलाठी सदस्य ग्रामस्थ यांनी मंजूर गावचे भूषण ताराबाई छबू पवार, तसेच पती छबु पवार मुलगी कविता लहू गांगुर्डे यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले

प्रतिनिधी - विठ्ठल वाघ कोपरगाव 

Post a Comment

0 Comments