शहादा:- तालुक्यातील मलगाव येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम मंजूर करण्यात यावे अशी मागणी मलगाव ग्रामपंचायतचे सरपंच अमीत पाडवी यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित उमेदवार मा खासदार गोवाल दादा पाडवी यांचा कडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे, कारणं की शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत मलगांव ता. शहादा जि. नंदुरबार येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम होवुन 25-30 वर्षे जुने असुन अनेक ठिकाणी पावसाळ्यात गळती लागत असते. भिंतीना तळे पडल्यामुळे सदर इमारतीपासुन ग्रामस्थांना धोका आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्वाचे दप्तर व साहित्यांचे नुकसान होत असते. तरी महोदयांना विनंती की, आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मौजे मलगांव येथे ग्रामपंचायतीचा कार्यभार सुरळीत होणे कामी ग्रामपंचायतीसाठी सुस्सज प्रशासकीय इमारत बांधकाम मंजूर होणेस नम्र विनंती मलगाव ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली
0 Comments