Advertisement

अंगणवाडी शाळेत बालकांना खराब पोषण आहार देण्यात येत असुन तात्काळ चौकशी करावी:- लखमापूर ग्रामस्थ


बागलाण :-लखमापूर तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथील सर्व अंगणवाडी शाळेत लहान बालकांना खराब पोषण आहार वितरित होत असून  या प्रकारा बाबत शासकीय स्थरावर लखमापूर येथील सर्व अंगणवाडी यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करून कार्यवाही करावी याबाबत..या मागणीचे निवेदन एकात्मिक महिला व बालकल्याण अधिकारी पंचायत समिती बागलाण, गटविकास अधिकारी पंचायत समिती बागलाण, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्राना देण्यात आले, यावेळी निवेदन देताना बिरसा फायटर्स संघटनेचे राज्य सचिव संजय दळवी सामाजिक कार्यकर्ते मा.भरत बोरसे,छोटू दळवी, दावल बोरसे,अरुण गायकवाड,हेमंत साबळे,मनोज माळी,बबलू भय्या आदी कार्यकर्ते उपस्थित होते..
  महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाने लहान बालकांना विविध जीवन सत्वे, वाढीसाठी तसेच कुपोषना वर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी शाळेत अनेक वर्षांपासून पोषण आहार सुरू केलेला असून मागील अनेक वर्षांपासून चांगल्या दर्जाची अन्न,धान्य वितरित होत आलेले आहे परंतु काही कालावधी पासून पोषण आहाराचा दर्जा अचानक निस्कृष्ट झाला असून बागलाण तालुक्यातील लखमापूर शेत्रातील अंगणवाडी शाळांमध्ये खराब पोषण आहार मिळत असून पोषण आहार व वाटप वेळेवर मिळत नसून 
दर दोन महिन्यांनी पोषण आहार देण्याबाबत शासन
नियम आहे पण आज सर्व अंगणवाडी  शाळेत याबाबत उदासीनता दिसून येत आहे.
    तसेच लखमापूर येथील अंगणवाडी शाळेत आदिवासी समाजाची तसेच इतर सर्व समाजाची  अनेक मुले अंगणवाडीत जातात परंतु या मुलांना त्यांच्यात जीवनसत्वे यांची कमतरता होऊ नये तसेच कुपोषणावर मात व्हावी या उद्देशाने शासनाने दिलेल्या योजनेचे तीन तेरा वाजले असून या अशा निस्कृष्ट दर्जाच्या अन्न,धान्य कडधान्या मुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो  या मुलांच्या पालकांनी या शाळांना भेट देऊन विचारणा केली असता शाळेत असलेले हे खराब कडधान्य  सँपल सह शासकीय अधिकारी यांना देत असून या झालेल्या/चाललेल्या  प्रकारा बाबत सरकारी स्थरावर उचित कार्यवाही करावी ही नम्र विनंती तसेच याबाबत बिरसा फायटर्स संघटना महाराष्ट्र राज्य द्वारे तसेच  सर्व आदिवासी समाजाकडून दिनांक ८ जुलै रोजी महिला व बाल विकास विभाग पंचायत समिती जवळ तहसिल दार कार्यालय बागलाण येथे जाहीर आंदोलन करण्यात येणार असून संघटनेकडून पुढील काळात  संपूर्ण महाराष्ट्र  राज्यात याबाबत तिव्र स्वरूपाचे जन आंदोलन करण्यात येईल याबाबत सरकारी दप्तरात  नोंद करन्यात यावी अशी आपणास नम्र विनंती आहे..अशी मागणी बिरसा फायटर्स संघटना कडून करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments