Advertisement

बिरसा फायटर्सचा दणक्याने भुलाणे ते मलगांव रस्त्याचे काम सुरू

निवेदनाची दखल; आंदोलनाचा दिला होता इशारा 
 
शहादा प्रतिनिधी: शहादा तालुक्यातील मंदाणे ते भोंगरा व भुलाणे ते मलगाव फाटा रस्ता तात्काळ दुरुस्ती करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार शहादा व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.त्यानंतर प्रशासनाने निवेदनाची दखल घेत भुलाणे ते मलगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे.
                          नंदूरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच बाईट आहे. अनेक ठिकाणी भगार रस्ते बघायला मिळतात. खड्‌ड्‌यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो. जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत. मंदाणे ते भोंगरा आणि भुलाणे ते मलगाव फाटा जाणारा रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यावर जिकडे तिकडे खड्ड्रेच खड्डे पडले आहेत. रस्ता खड्ड्यात की खड्ड्‌यात रस्ता असा सवाल उपस्थित केला जात आहे, निवडणूकचा आधी दोन तीन महिन्यांपूर्वी भोंगरा ते भुलाणे रस्ता दुरुस्ती करण्यात आला होता पण निवडणूक लागल्यावर पुढिल काम थांबवले गेले आहे, निवडणूका जवळ आल्याने ही आमदार खासदार मंत्री यांना आठवण येते का इतर दिवशी आठवण येत नाही का अशा सुद्धा प्रश्न निर्माण होतो,मंदाणे ते भोंगरा आणि भुलाणे ते मलगाव फाटा हा रस्ता अतिशय खराब असल्याने अपघाताचा प्रसंग जास्त आहे, नागरिकांना येण्या जाण्या साठी त्रास द्यायक होत आहे,तरी वरील विषयानुसार निवेदनाची दखल घेऊन शहादा तालुक्यातील रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे अशी विनंती रस्ता दुरुस्ती न झाल्यास बिरसा फायटर्स तर्फे घंटा आंदोलन छेडण्यात येईल .याची नोंद घ्यावी ,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments