Advertisement

पेसा भरती त्वरित सुरू करा- बिरसा फायटर्सची मागणी

शहादा प्रतिनिधी: १७ संवर्गातील आदिवासी कर्मचाऱ्यांची पेसा भरती तात्काळ सुरू करा ,अशी मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदूरबार संघटनेकडून एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री,देवेन्द्र फडणवीस,अजित पवार, उपमुख्यमंत्री,मंत्रालय मुंबई यांना तहसीलदार तहसील कार्यालय शहादा जिल्हा यांच्यामार्फत करण्यात आली आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नंदूरबार जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते, राणीपूर गाव शाखेचे रवींद्र पवार, दिलीप ठाकरे,संगिता ठाकरे , आंबापूर गाव शाखेचे सतीश पावरा,सुरेश पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                 महाराष्ट्र राज्यातील आदिवासी कर्मचाऱ्यांच्या १७ संवर्गातील पेसा भरतीला मा. न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आलेली आहे.त्यानूसार आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया होत नाही.फक्त बिगर आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू आहे.म्हणून आदिवासी उमेदवारांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पालघर जिल्ह्य़ातील बिगर आदिवासी याचिका कर्त्यांनी मा.उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे.त्यानूसार विद्यार्थांच्या भरती प्रक्रियेतील निकालानंतरही नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाहीत. अनेक सुशिक्षित उमेदवार बेरोजगार झालेले आहेत. काहींची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे.त्यामुळे आदिवासी बांधवांत सर्वत्र नाराजी निर्माण झालेली आहे.बिगर आदिवासींची भरती प्रक्रिया सुरू व आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया बंद असल्यामुळे आदिवासी उमेदवारांवर फार मोठा अन्याय होत आहे.म्हणून १७ संवर्गातील आदिवासी कर्मचाऱ्यांची पेसा भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments