Advertisement

पैसे वाटपाचा उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयातून विडीओ गायब

 भोंगरा येथील पैसे वाटप प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी चौकशी अधिका-यांची धडपड

शहादा प्रतिनिधी : शहादा तालुक्यातील भोंगरा या गांवात मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटणा-या विडीओतील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण, शांतीलाल शंभू पावरा (बर्डे) , कैलास बलजी भामरे ,उदयसिंग फत्तेसिंग चव्हाण या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा,या मागणीसाठी नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ५०१ वे उपोषण छेडले होते.दरम्यान उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी मतदारांना पैशे वाटणा-यांची चौकशीचे आदेश सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शहादा विधानसभा मतदारसंघ यांना दिले.दिनांक ११ जून २०२४ रोजी तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांनी आपले लेखी म्हणणे व पेनड्राइव्हमध्ये पुरावा म्हणून विडीओ उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांना सादर केला.दोषारोपित पक्षाकडून आपली बाजू मांडण्यासाठी दिनांक १४/०६/२०२४ रोजी सुनावणी घेण्याबाबत विनंती करण्यात आली.त्यानुसार दिनांक १४/०६/२०२४ रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात आली. सुशिलकुमार पावरा यांनी पेनड्राइव्हमध्ये जमा केलेला विडीओ संगणकावर दिसत नाही,असे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले.त्यावर सुशिलकुमार पावरा यांनी चौकशी अधिका-यावर शंका उपस्थित केली.त्यानंतर पुन्हा नवीन पेनड्राइव्हमध्ये भोंगरा येथील पैसे वाटपाचा विडीओ उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे खात्री करून जमा करण्यात आला.दोषारोपित व्यक्तींनी आपल्या वकिलामार्फत आपली बाजू मांडली.
                    नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक १३ मे २०२४ रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच व इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुलेआम पैसे वाटप करत असल्याचा विडीओ वाॅटसप ग्रूपवर वायरल होत आहे.लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडला आहे.पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोक लोकशाहीची हत्या करीत आहेत. मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे,पैसे देणे,आमीश दाखवणे,धमकावणे हा गुन्हा आहे.तरी सदर विडीओची सखोल चौकशी करून संबंधित लोकनियुक्त सरपंच व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.प्रांत कार्यालयातून विडीओ गायब होणे,ही एक चिंतेची बाब आहे.यातून चौकशी अधिकाऱ्यांकडून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे,असा आरोप केला जात आहे.उपविभागीय अधिकारी यांनी या प्रकरणात योग्य न्याय न दिल्यास त्याविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरच उपोषण करणार असल्याचा इशारा तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments