Advertisement

शहाणा गावात गुणवंत विद्यार्थी,नवनियुक्त व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

यशाचे घमंड करू नका व अपयशाने खचून जावू नका- सुशिलकुमार पावरा

 शहादा प्रतिनिधी: दिनांक 30 जून रोजी शहाणे नगरीत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. आताच्या काळात शिक्षणाला खूप महत्त्व आहे .शहाणा या गावात कर्मचारी व ग्रामस्थ मंडळींनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन Motivation मिळणार म्हणून एक अनोखा उपक्रम राबवला त्यात इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात आला तसेच गावातील नवनियुक्त कर्मचारी , सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या सुद्धा सत्कार करून गावामध्ये मागील तीन-चार वर्षांपासून परंपरा चालू ठेवली सदर कार्यक्रमाला गावची लेक संध्या रोहिदास जाधव RTO नंदुरबार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा व त्यांची टीम , सेवानिवृत्त प्राचार्य सायसिंग भंडारी , वैद्यकीय अधिकारी डॉ.जितेंद्र भंडारी गावातील आजी-माजी सरपंच व सदस्य , पोलीस पाटील, कर्मचारी व तरुण मंडळी ,लहान बालके या गुणगौरव व सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वप्रथम इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक समीर मका तडवी 92% मिळवून गावात व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शहाणा प्रथम आला.द्वितीय क्रमांक आशिष मूंगा पावरा 90% मिळवले.तृतीय क्रमांक श्रेयस चंपालाल सुळे 83 टक्के( इंग्रजी माध्यम) व इतर सर्व दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस व गौरविण्यात आले. इयत्ता बारावी प्रथम क्रमांक रोशन मुन्ना चव्हाण 82. 80% मिळवून गावात प्रथम आला.द्वितीय क्रमांक सागर कैलास ठाकरे 79 % मिळवले. तृतीय क्रमांक इंद्रजीत मेहरबान भंडारी 75.15% सचिन पवार 75 % व इतर बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून श्री. विठ्ठल सुभाष भंडारी यांनी आपला काव्यसंग्रह (तीर कलम )इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिले कु. रोनक अरुण भंडारी इयत्ता सहावीत नवोदय विद्यालय येथे निवड झाली. राकेश मोरे यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री मिळवली.
                        नवनियुक्त कर्मचारी 1)श्री जालिंदर दारासिंग बर्डे न्यायालय विभाग -हिंगोली
 2) श्री संजय शिवाजी तडवी माध्यमिक शिक्षक-चिरखान 
3) श्री कांतीलाल फुलसिंग मोते आरोग्य सेवा PHC शहाणा
4) प्रतीक भिमसिंग जाधव कृषी विभाग
5) अशोक रोहिदास जाधव भूरचना नगर विकास अधिकारी.
सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमती रेसा बाई सुरेश जाधव आरोग्य विभाग परिचारिका यांच्या सत्कार करण्यात आला व उत्कृष्ट कामगिरीबद्दल आरोग्य विभाग डॉ. निलेश पावरा, सामाजिक कार्यात समाजसेवा करण्यासाठी तत्पर रावण साम्राज्य ग्रुप दिपक तडवी व त्यांची टीम , क्रीडा क्षेत्रात कु.नीता कैलास ठाकरे कु. सचिन कैलास ठाकरे यांच्या गौरव व सत्कार करण्यात आला... मान्यवरांच्या मनोगतात श्री सायसिंग भंडारी सेवानिवृत्त प्राचार्य , श्री सुशील कुमार पावरा, संध्या जाधव ,डॉ.जितेंद्र भंडारी, डॉ.रोहिदास जाधव यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि शिक्षणाविषयी अमूल्य असे मार्गदर्शन केले आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बन्सीलाल भंडारी यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश भंडारी,गोपाल भंडारी ,शिवराम पावरा ,सोमनाथ सुळे, जितेंद्र-वन लता मेडिकल ,संजय मोते,राकेश मोरे ,संजय तडवी,विशाल सुळे,दिनेश ठाकरे ,बाजीराव भंडारी, राकेश सुळे ,अक्षय भंडारी,सचिन भंडारी, अजय ठाकरे , करण भंडारी,दिपक तडवी,अनिल पवार, रंजीत भंडारी व इतर कर्मचारी व ग्रामस्थांनी, तरुण मंडळी नी मेहनत घेतली आणि गुणगौरव सत्कार समारंभ कार्यक्रम अति आनंदाने व गुण्यागोविंदाने साजरा करण्यात आला..

Post a Comment

0 Comments