Advertisement

चांदसैली घाटावरील रस्त्यासाठी बिरसा फायटर्सचे ११ जूनला घंटानाद आंदोलन


धडगांव प्रतिनिधी:  धडगांव ते तळोदा मार्गावरील चांदसैली घाटावरील खड्डेमय व धोकादायक रस्त्याच्या दुरूस्तीसाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून दिनांक ११ जून २०२४ रोजी दुपारी १२ वाजता चांदसैली घाटावर घंटानाद आंदोलन छेडण्यात येणार आहे.नंदूरबार जिल्ह्य़ातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे.अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो.जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत. धडगांव तालुक्यातील रस्ते हे खड्डेमय असून लाजिरवाणे आहेत. धडगांव ते तळोदा मार्गावरील चांदसैली घाटावरील रस्ता हा अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे.हा रस्ता पूर्ण पणे उखडला आहे.रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे झाले आहेत.रस्त्यावर मोठमोठे दगड गोटे पडलेले दिसतात. रस्त्याच्या आजूबाजूलाच ब-याच ठिकाणी आळोशाला भिंत नाही. रस्ता अत्यंत धोकादायक आहे.या रस्त्यावरून अनेक वाहनांचे अपघात होऊन प्रवाशांना दुखापत होत आहे.प्रवाशी मुठीत जीव घेऊन प्रवास करतात. या रस्त्यावर पूर्वी सुद्धा अनेक भयंकर अपघात झाले आहेत. त्यात अनेक निरपराध जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.आता सुद्धा या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे.
                      रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे,तरी येथील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकांत संताप निर्माण झाला आहे.खड्डे चूकवून गाडी काढताना अपघात होत असून प्रवाशांना दुखापत होत आहे व गाडयांचेही प्रचंड नुकसान होत आहे.या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे अपघात होऊन मृत्यू होत  आहेत. म्हणून या रस्त्याच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी  धडगांव ते तळोदा मार्गावरील चांदसैली घाटावरील रस्त्यावर आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिनांक ११/०६/२०२४ रोजी दुपारी १२ वाजता घंटानाद आंदोलन करणार आहोत.असे निवेदन तहसीलदार धडगांव व उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments