Advertisement

मतदारांना पैसे वाटणा-या जाम येथील सुभाष वाघ विरोधात निवडणूक निर्णय अधिका-यांकडे तक्रार,विडीओची होणार चौकशी

शहादा प्रतिनिधी- शहादा तालुक्यातील जाम  या गांवात मतदानाच्या आधल्या दिवशी ३००-३०० रूपये  पैसे वाटणा-या विडीओतील जाम  येथील  सुभाष शिवाजी वाघ  व इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा,अपक्ष उमेदवार, नंदूरबार लोकसभा मतदारसंघ यांनी जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी नंदूरबार लोकसभा मतदारसंघ यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली आहे .नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक १२ मे २०२४ रोजी शहादा तालुक्यातील जाम  येथील सुभाष शिवाजी वाघ व इतर काही व्यक्तींनी मतदारांना ३००-३०० रूपये   वाटल्याचा व पैसे वाटप  करत असल्याबाबतचा , पैसे मोजत असल्याचा  विडीओ वाॅटसप ग्रूपवर वायरल होत आहे.
                   तिकडे केव्हा पैसे वाटणार, वाटणार तर सारखे सारखे वाटा ,उपुरे सुपरे कशाला ? तिकडून इकडे कशे काय आले तुम्ही ? लिस्टप्रमाणे पैसे वाटप करत होते.इकडे काय झाले? वोटर स्लीप नुसार ३००-३०० रूपये दिले. लिस्टप्रमाणे ३०० रूपये ,सुरवात कशी काय केली? ३०० रूपये ,किती वाटले?३०० आणि सुना काकाच्या घरातून २००-२०० वाटले,कसं काय ?वरूनच पैसे कमी आले?त्यांना समोर बसून त्यांच्यासमोर पैसे घ्यायचे होते ना! कोण आला होता पैसे घ्यायला?ते आणतील ना पैसे, याच्यात बघा. असे  पैसे मोजत असताना संभाषण सुरूच होते.आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावे,म्हणून व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमीश दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे.लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडला आहे.पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोक लोकशाहीची हत्या करीत आहेत. मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे,पैसे देणे,आमीश दाखवणे,धमकावणे हा गुन्हा आहे. पैसे वाटूनच निवडणूक जिंकता येते,पैसेवाला माणूसच निवडणूक जिंकू शकतो,अशी लोकशाहीला घातक पद्धत यांनी निर्माण करून ठेवली आहे. पैसे वाटणा-यांवर कारवाई होत नाही,अशी धमकीही हा व्यक्ती देतो.अर्थात सदर व्यक्तीला कायद्याचा अजिबात धाक नाही. तसेच तक्रारदाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल पोलीस ठाणे शहादा येथे दिनांक २९/०६/२०२४ रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे.तरी सदर विडीओची सखोल चौकशी करून संबंधित  सुभाष शिवाजी वाघ व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली आहे.सदर तक्रार मुख्य आयुक्त, निवडणूक आयोग नवी दिल्ली,सहा.निवडणूक निर्णय अधिकारी शहादा विधानसभा,पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा, पोलीस अधीक्षक नंदूरबार यांच्याकडेही देण्यात आली आहे.कारवाईच्या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा यांचे उपोषणही होणार आहे.

Post a Comment

0 Comments