Advertisement

पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करणा-या नराधामांना कडक शिक्षा करा- बिरसा फायटर्सची मांगणी

शहादा प्रतिनिधी- धुळे जिल्ह्य़ातील पिंपळनेर येथे २६ मे २०२४ रोजी आदिवासी महिलेवर बलात्कार करणा-या नराधामांना कडक शिक्षा करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे,पोलीस निरीक्षक पिंपळनेर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,उपाध्यक्ष गणेश खर्डे , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,अरूण पावरा,गुलाबसिंग पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                    दिनांक २६ मे २०२४ रोजी धुळे जिल्ह्य़ातील पिंपळनेर येथील बैल बाजार मार्केट मध्ये रात्री ११ वाजता एका आदिवासी महिलेवर २ नराधामांनी महिलेच्या मुलासमोरच सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.माणूसकीला काळीमा फासणा-या या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.आरोपींना कुठल्याही प्रकारची जामीन मिळणार नाही व आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी. ३९ वर्षीय पिडीत महिला व तिचा मुलगा हे आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असता गाडी न सापडल्यामुळे तेथे स्वप्नील वाघ व निलेश निकम या दोन जणांनी त्या महिलेला पिंपळनेर येथील उपबाजार समितीच्या बाजारात ओढत नेले. तेथे या दोन तरूणांनी आळीपाळीने त्या महिलेवर अत्याचार केला.ते दोघे जण पीक अप मधून तेथून फरार झाले.त्या आरोपींना अटक करण्यात यावी व आरोपींविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.जेणेकरून पुन्हा महिलांवर अशे अत्याचाराचे प्रकार घडणार नाहीत .तरी आरोपींना कठोर कारवाई करावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments