Advertisement

मतदानाच्या दिवशी पैसे वाटणा-या भोंगरा येथील सरपंचाला पदावरून काढण्याची मागणी

पैसे वाटो, निवडणूक जिंको, लोकशाहीला घातक पद्धत बंद करा- सुशिलकुमार पावरा

शहादा प्रतिनिधी :01- नंदुरबार लोकसभा मतदारसंघात शहादा तालुक्यातील भोंगरा या गांवात मतदानाच्या दिवशी मतदारांना खुलेआम पैसे वाटणा-या ,लाच देणा-या भोंगरा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री. दिनेश छोटूसिंग चव्हाण यांना सरपंच पदावरून काढून टाका,कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा,अपक्ष उमेदवार, नंदूरबार लोकसभा मतदारसंघ, तथा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.
                 नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक १३ मे २०२४ रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण व शांतीलाल संभू पावरा( बर्डे),कैलास बलजी भामरे,उदयसिंग फत्तेसिंग चव्हाण , इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुलेआम पैसे वाटप करत असल्याचा विडीओ वाॅटसप ग्रूपवर वायरल होत आहे.मतदारांच्या हातात २०० रूपयाच्या २ नोटा असे ४०० रूपये पैसे देऊन फुलवर म्हणजेच
कमळावर मतदान करा, नाहीतर तुम्हाला पुढच्या वेळेस पैसे देणार नाहीत, कमळावरच मतदान करा,अशी धमकी सदर इसम देत आहेत.फुलावर मतदान करा असे म्हणत असल्याने सदर सरपंच व व्यक्ती हे भाजप पक्षाकडून पैसे वाटप करीत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते .आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावे,म्हणून या लोकनियुक्त सरपंचाकडून व व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमीश दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे.लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडला आहे.पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोक लोकशाहीची हत्या करीत आहेत. पैसे असणारा, पैसे वाटणारा उमेदवारच निवडणूक लढवू शकतो,जिंकू शकतो ,अशी लोकशाहीला अत्यंत धोकादायक पद्धत या लोकांनी बनवून ठेवली आहे.मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे,पैसे देणे,आमीश दाखवणे,धमकावणे हा गुन्हा आहे. लोकनियुक्त सरपंचाला असे काम करणे शोभत नाही.सदर सरपंचाने मतदारांना लाच देऊन गंभीर गुन्हा केला आहे.तरी सदर विडीओची सखोल चौकशी करून संबंधित भोंगरा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी.तसेच सरपंच दिनेश चव्हाण यांना सरपंच पदावरून काढून टाकण्याची कायदेशीर कारवाई करावी.या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा यांनी उपोषणाचा इशाराही दिला आहे.

Post a Comment

0 Comments