Advertisement

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्या,बिरसा फायटर्सची मागणी

शहादा प्रतिनिधी: वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे तहसीलदार शहादा यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,अरूण पावरा,गुलाबसिंग पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.     
                          राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन होत आहे.नंदूरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने व वादळी वा-याने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान शहादा तालुक्यातील वडाळी, बामखेडा, काकर्दे, येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच जीवनमान विस्कळीत झाले आहे.यात काकर्दे येथे तुरळक प्रमाणात गारा पडल्या तर वडाळी,बामखेडा,काकर्दे, तारखेडा, फेस, खैरवे परिसरात वादळी वाऱ्यासह हाहाकार उडाला.बामखेडा येथे सर्वात जास्त नुकसान झाले असून येथे मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याने अनेक घरांचे इंगलसहपत्रे उडाली आहेत. यामुळे अनेकांचे संसार उघडय़ावर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.तर मोठ्या प्रमाणात झाडे उमळून पडली असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण फिरावे लागत आहे.या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरे सुद्धा पडल्याने आदिवासी कुटुंबियाचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांचे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments