धडगांव प्रतिनिधी: अक्राणी ते चुलवड, कालीबेल, दाब वाया अक्कलकुवा मार्गावरील खड्डेमय रस्त्याचे तात्काळ काम करा अन्यथा बिरसा फायटर्सच्या घंटानाद आंदोलन करू,असा इशारा बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदूरबार संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार धडगांव यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप पावरा ,राजेश पावरा, प्रविण वळवी,संजय पाडवी,गिरधर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदूरबार जिल्ह्य़ातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे.अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो.जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत. तालुकानुसार विचार केला तर धडगांव हून चूलवड वाया अक्कलकुवा जाणारा मुख्य रस्ता ,माजी आदिवासी विकास मंत्री तथा अक्राणी अक्कलकुवाचे विद्यमान आमदार के सी पाडवी यांच्या असली या गावाकडे ,अस्तंभा कडे जाणारा रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे.रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता असा सवाल उपस्थित केला जात आहे.धडगाव ते दाब पर्यंत हा रस्ता खूपच खराब झाला आहे.धडगाव हून चुलवड कालीबेल दाब अक्कलकुवा या गावी जाण्यासाठी प्रवासी जरली मार्गाचा वापर करतात,परंतू जरली येथील पूलावरील लोखंड वर उखडून आले आहे,पूल कधीही कोसळून नदीत वाहून जाईल,अशी स्थिती निर्माण झाली आहे,म्हणून लोक जरली मार्गाचा वापर न करता धडगांव हून राडीकलम मार्गे चूलवड कालीबेल दाब व अक्कलकुवा येथे जात आहेत.
रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे,तरी येथील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकांत संताप निर्माण झाला आहे.खड्डे चूकवून गाडी काढताना अपघात होत असून प्रवाशांना दुखापत होत आहे व गाडयांचेही प्रचंड नुकसान होत आहे.या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत. हा रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे.या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी बिरसा फायटर्स धडगाव शाखेने घंटानाद आंदोलनही केले होते.स्वत: श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवले.तरीही या रस्त्याचे अद्याप काम सुरू झालेले नाही.अक्राणी ते चूलवड, कालीबेल, दाब वाया अक्कलकुवा रस्त्याचे तात्काळ काम सुरू करण्यात यावे.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
0 Comments