Advertisement

कॉंग्रेस व भाजप कडून पैशांचा पाऊस,तरी "नागरिक" चिन्ह ठरवणार नंदूरबारचा खासदार

शहादा (प्रतिनिधी) :नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचे मतदान दिनांक १३ मे २०२४ रोजी पार पडले.काँग्रेस व भाजप पक्षाकडून आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदारांवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. अनेक ठिकाणी प्रत्येकी १००,२००,३००,५०० रूपये पैशे वाटल्याची उघड चर्चा सुरू आहे.काँग्रेस व भाजप कडून खुलेआम पैशे वाटल्याचे विडीओ व फोटो सोशल मिडीयावर वायरल होत आहेत. अनेक मतदानकेंद्रावर १०० मिटरच्या आत पैशे वाटणे,मतदारांना पैशांची आमीश दाखवणे,इशा-यावर मतदान करायला लावणे,असे गैरप्रकार आढळून आले.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी अशा गैरप्रकाराबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नंदूरबार यांच्याकडे तक्रार केली आहे.पैशे वाटून मतदान घेणे,हा प्रकार लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार आहे.आपले मत अमूल्य आहे,पैसे वाटणा-यांना व पैसे देणा-यांना मतदान करू नका,असा स्पष्ट जनजागृतीचा संदेश बिरसा फायटर्सच्या जाहीरनाम्यात देण्यात आला होता.तरी अनेक ठिकाणी पैशांवर मतदान झाल्याचे वृत्त आहे.
                    काँग्रेस व भाजप कडून पैशांचा अफाट पाऊस पाडण्यात आला असला तरी अपक्ष उमेदवार सुशिलकुमार यांच्यामुळे नंदूरबारचा निकाल अस्पष्ट आहे.कोण मारणार बाजी?काँग्रेसचे गोवाल पाडवी की भाजपच्या हिना गावीत की दोघांना सोडून बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा.निवडणूक रिंगणात एकुण ११ उमेदवार होते.त्यात काँग्रेस व भाजप व अपक्ष उमेदवार यांचीच अधिक चर्चा सुरू आहे. काँग्रेस च्या पंजा व भाजप च्या कमळ चिन्हा सोबतच अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांच्या नागरिक चिन्हावर ब-यापैकी मतदान झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.त्यामुळे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांच्या "नागरिक" चिन्हाला किती मते मिळतील, त्यावरून नंदूरबारचा खासदार ठरणार आहे.निकालाकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments