Advertisement

स्थलांतरित मजूरांचाही अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना पाठिंबा

भविष्यात एकही आदिवासी मजूरीसाठी इतर राज्यात जाणार नाही- सुशिलकुमार पावरा 

शहादा :नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात 
बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना स्थलांतरित आदिवासी मजूर बांधवांनीही पाठिंबा दर्शविला आहे.सर,आम्ही तुम्हाला मतदान करण्यासाठी नंदूरबारला येणार आहोत. प्रथमच आमचा रोजगाराचा प्रश्न सोडवू शकेल, असा उमेदवार तुमच्या रूपात आम्हाला मिळाला आहे.असे फोनवर बोलत गुजरात, पंढरपूर, पुणे या भागात कामानिमित्त गेलेल्या आदिवासी मजूर बांधवांनी अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.मजुरांचा स्थलांतरण हा प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नाही.नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात अनेक पुढारी झालेत. त्यांनी नंदूरबार येथील लोकांसाठी रोजगार मिळावा म्हणून छोटे मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न केला नाही.येथील साखरकारखाने व सुतगिरणी बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.आम्ही कोवीड कालावधीत बाहेरगावी फसलेल्या मजूर बांधवांना स्वत चे पैसे खर्च करून गाडी करून त्यांच्या स्वगृही पोहचवले आहेत. ठेकेदार मजूरांना मजूरी देत नाहीत, अशावेळी भांडून मजूरी मिळवून दिली आहे.मजूरांसाठी बिरसा फायटर्स टिमने चांगले काम केले आहे.याची जाणीव मजूर बांधवांना आहे.
                    आम्ही नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात कारखाने आणू,सुतगिरणी आणू,उद्योग आणू, लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ.अशी आमची इच्छाशक्ती आहे.भविष्यात एकही आदिवासी बांधव दुस-या राज्यात किंवा जिल्हा सोडून जाणार नाही.याची मी गॅरेंटी देतो.मी सगळ्या आदिवासी मजूर बांधवांना आवाहन करितो की,तुम्ही यावेळी लोकसभा निवडणुकीत मतदान करायला या.तुमचे मत खूपच किंमती आहे.तुमची मते नंदूरबार लोकसभाश्रॆत्राचा निकाल बदलू शकतात. असे आवाहन अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी केले.सुशिलकुमार पावरा यांना ५८ पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे.विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे.सर,आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच, असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा आहे.आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करणार, असा ठाम निर्धार चूलवड ग्रामस्थांनी केला आहे. शहादा,शिरपूर, धडगांव, अक्कलकुवा,साक्री तालुक्यातील अनेक गांवांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे.त्यामुळे नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे जिंकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments