Advertisement

दुपारी अफवा,रात्री फसवा!महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा डाव फसला

काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा नाही- बिरसा फायटर्स

शहादा: १७ एप्रिल बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने तळोदा येथे बैठक घेण्यात आली.त्या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांना पाठिंबा द्यायचे ठरले आहे,असा मेसेज बिरसा आर्मीचे अक्कलकुव्याचे उपाध्यक्षपंकज पाडवी यांनी ब-याच ग्रूपवर दुपारी फाॅरवर्ड केली.त्यानंतर काही काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तीच पोस्ट ग्रूपवर फाॅरवर्ड करण्यात आली.परंतु पंकज पाडवी हा १४ तारखेला तयार करण्यात आलेल्या नवीन संघटनेतला फूटीर माणूस आहे.हे नंतर लोकांच्या लक्षात आले.नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात बिरसा फायटर्स संघटनेकडून अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढणार आहे,हे घोषित झाल्यानंतर मला ५८ सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला.त्यानंतर नंदूरबार लोकसभाश्रॆत्रातील ८ तालुक्यातील वाढता पाठिंबा बघून, गांवोच्या गावे पाठिंबा देत आहेत, हे बघून काँग्रेस पक्षांच्या लोकांची ,काँग्रेस उमेदवाराची पायाखालची माती घसरली.त्यांना आपला पराभव १०० टक्के होणार हे दिसत असल्यामुळे त्यांनी आमच्या बिरसा फायटर्स संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला.
                    आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आमीश दाखवून माझी उमेदवारी माघार घेण्यासाठी दबाव सुरू केला.मी उमेदवारी मागे घेत नाही हे बघून राजेंद्र पाडवी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला व १४ एप्रिल ला बिरसा आर्मी नावाची संघटना घोषित केल्याचे दाखवून कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले.त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या लोकांना हाताशी धरून बिरसा फायटर्सचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय अशी खोटी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला.रात्री आमची बिरसा आर्मी नावाची नवीन संघटना तयार झाल्याची पोस्ट टाकली.बिरसा फायटर्स संघटनेचा काँग्रेस व भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाशी संबंध नाही.ज्यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा द्यायला राजीनामे दिले आहेत, जे काँग्रेस पक्षाचे गुलाम व्हायला निघाले आहेत,त्या पक्षांच्या गुलामांना खूप खूप शुभेच्छा.पक्षांच्या उमेदवाराचा प्रचार करणा-यांना बिरसा फायटर्स संघटनेकडून काढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.त्यांनी बिरसा फायटर्स या नावाचा कुठेही दुरूपयोग करू नये.अशा पक्षांच्या गुलामांमुळे आजही आपला समाज एकत्रित होत नाही,त्यामुळे समस्या जैसे थेच आहेत. अशा पक्षांच्या गुलामांपासून लोकांनी सावधान राहा.पक्षांच्या गुलामांना जाब विचारा की,सामाजिक संघटना सोडून पक्षांची गुलामी का करत आहेत. जे संघटनेचे झाले नाहीत, ते पक्षांचेही होणार नाहीत. या पक्षांच्या दलालांना मतदानातून दणका दाखवा.पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करा,काँग्रेस किंवा भाजपचा उमेदवार विकास करणार नाही.हे स्वार्थी लोक आहेत. म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून मला सपोर्ट करा.मला भरघोस मतांनी निवडून द्या.नक्कीच बदल होईल. अफवेवर व पक्षांच्या दलालांवर विश्वास ठेवू नका. लढेंगे और जितेंगे,अपक्ष उमेदवार जितेंगे! अशी प्रतिक्रिया बिरसा फाइटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments