Advertisement

बिरसा फायटर्स संघटनेला भारत सरकारची मान्यता

नोंदणीकृत संघटनेचीच दखल घेतली जाते,कामे होतात, ही अफवा चूकीची- सुशिलकुमार पावरा

शहादा: भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९(१ )सी अन्वये प्रत्येक व्यक्तीला संघटना तयार करण्याचा व त्यात काम करण्याचा अधिकार आहे.आदिवासींच्या हितासाठी,सर्वांगीण विकासासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी, आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता,जल,जंगल, जमीन यांच्या संरक्षणासाठी,आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी,आदिवासींचे अधिकार व हक्क, आरक्षण वाचविणायासाठी, आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाविरोधात निवेदन देणे,पाठपुरावा करणे,उपोषण करणे,मोर्चा काढणे,आंदोलन करणे,प्रसंगी न्याईक लढाई लढण्याचे काम आमची बिरसा फायटर्स संघटना करते.
                    बिरसा फायटर्स ही वैचारिक व लढाऊ संघटना आहे.संघटनेला २ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे.संघटनेच्या ३५६ हून अधिक शाखा झाल्या आहेत. संघटनेचा दिवसेंदिवस विस्‍तार वाढत आहे,शाखा वाढत आहेत. हे बघून काही संघटना पदाधिकारी यांनी नोंदणीकृत संघटनेतच काम केले पाहिजे .नोंदणीकृत नसलेल्या संघटनेच्या निवेदनांची दखल सरकार घेत नाहीत. त्यांची कामे होत नाहीत. नोंदणी नसलेल्या संघटनेत काम केल्यावर पोलीस पकडून नेतात, अटक करतात, अशा प्रकारची चूकीची अफवा पसरवली.संघटना ही रजिस्टर असली काय नसली काय, काहीही फरक पडत नाही.उलट नोदणी नसलेली संघटना सरकारच्या कोणत्याच बंधनात नसते.स्वतंत्र पणे काम करू शकते.आमची संघटना नोंदणी नसतानाही आम्ही सरकार दरबारी लाखो निवेदन दिली.हजारों कामे यशस्वी झाली.तरी संघटना रजिस्टर करावी,असे आमचे ठरले.त्यानुसार संघटनेची BIRSA MUNDA REVOLUTIONARY FORCE TRIBAL RIGHTS FEDERATION या नावाने नोंदणी करण्यात आली आहे.संघटनेचा नोंदणी क्रमांक मिळाला आहे.आयकर विभागाचाही नंबर आला आहे.म्हणून सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो की,आपणही सामाजिक लढाई लढण्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेत सहभागी व्हा,बिरसा फायटर्स जाईन करा,असे आवाहन बिरसा फाइटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments