Advertisement

काँग्रेस पुढाऱ्यांचा बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांवर दबाव



पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार- सुशिलकुमार पावरा

शहादा:बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. सुशिलकुमार पावरा यांना दिवसेंदिवस जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.पावरा यांना ५८ पेक्षा अधिक संघटनांचा व शहादा,शिरपूर, धडगांव, अकक्लकुवा तालुक्यातील अनेक गांवांनी जोरदार पाठिंबा दिला आहे.त्यामुळे पक्षांच्या उमेदवारांत भिती निर्माण झाली आहे.काँग्रेस पक्षाचे पुढारी हे बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याची तक्रार समोर येत आहे.काँग्रेस पक्षांच्या पुढा-यांनी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांत फूट पाडण्याचे काम सुरू केले आहे.शिरपूर तालुक्यातील १-२ बिरसा फायटर्स पदाधिकारी काँग्रेस पुढा-यांना भेटल्याची माहिती समोर आली आहे.महाविकास आघाडीकडून आयोजित सभेत सुद्धा अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना निवडणूकीतून माघार घेण्यासाठी दबाव टाकणार असल्याचे समोर आले.त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांना सारखे फोन करून मानसिकता बिघडवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 
                 सगळ्यांना जय बिरसा,जय आदिवासी, जय जोहार. नंदुरबार लोकसभाश्रॆत्रातील सगळ्या बिरसा फायटर्स टीम ला कळविण्यात येत आहे की, जस जसे निवडणूक जवळ येत आहे.तस तसे काही पक्षा वाले लोक आपल्या काही कार्यकर्त्यांवर दबाव आणत आहेत, आर्थिक आमिष दाखवतील , तरी आपण कोणीही विचलित होऊन जाऊ नका.आपले बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे एकुण ९ पक्षांचे तिकीट नाकारून अपक्ष निवडणूक लढण्यास तयार आहेत. पक्षांच्या नेत्यांवर व उमेदवारांवर लोकांचा विश्वास नाही.फक्त सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांवर लोकांचा विश्वास आहे. बिरसा फायटर्स उमेदवारांवर लोकांचा विश्वास बसला आहे.म्हणून आपण अपक्ष उमेदवार माननीय सुशिलकुमार पावरा सर यांना एकजूटीने साथ देऊयात. हीच नम्र विनंती .लढेंगे और जितेंगे! असा संदेश जलिंदर पावरा ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बिरसा फायटर्स नंदुरबार यांच्यामार्फत वाॅटसप ग्रूपवर टाकण्यात आला आहे.
             जे काँग्रेस पुढारी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत, त्यांच्यावर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात येईल व पत्रकार परिषदेत काँग्रेस कडून सुरू झालेल्या दबाव तंत्राचा निषेध केला जाईल, अशी माहिती सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments