तळोदा: बोरद ते करडे रस्त्याच्या निष्कृष्ट कामांची चौकशी करून ठेकेदार व अभियंत्यांवर निधी अपहार केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार तळोदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळीबिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, हिरामण खर्डे,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, वनसिंग पटले,माधव वसावे,किसन वसावे,जयसिंग वसावे,चंद्रसिंग वसावे,बोडो पटले,दिनेश वळवी,जयसिंग वसावे,गोवरया भील, जयराम पटले,हाना पटले,नारसिंग वसावे,खेमजी वळवी,मोग्या वसावे,वसंत भील,टेट्या वळवी,रूषग्या वळवी,जयसिंग वळवी, पिंट्या वळवी,फुलसिंग वसावे,किसन वळवी,रिविलाल तडवी,रतिलाल भील, दाज्या वसावे,मदा पावरा आदि ३० कार्यकर्ते उपस्थित होते.
बोरद ते करडे पर्यंतचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला होता.रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती होती.या रस्त्याचे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे काम संबंधित ठेकेदार व अभियंत्यांने केलेले आहे.रस्त्यावर खडी डांबर टाकणे सोडून मुरूम व लाल माती टाकून रस्ता पूर्ण केला आहे.रस्त्याचे डांबरीकरण केले की मातीकरण केले,असा प्रश्न निर्माण होत आहे.पावसाळ्यात रस्त्यावरील माती वाहून जाईल व रस्ता पूर्वीप्रमाणेच खड्डेमय होईल. लाखोंचा निधी खर्च करूनही ठेकेदार व अभियंता यांनी रस्त्यावर डांबरीकरण केले नाही.रस्त्याचे काम अत्यंत नित्कुष्ट झाल्यामुळे येणा-या जाणा-या प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.माती व खडी वर आल्यामुळे दूचाकीस्वारीचे अपघात होऊन दुखापत होत आहेत. सदर रस्ता दुरूस्ती कामात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.म्हणून बोरद ते करडे रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी ठेकेदार व अभियंत्यांवर फौजदारीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.
0 Comments