Advertisement

शेतक-यांच्या विजेसाठी बिरसा फायटर्स आक्रमक, रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

शहादा: गणोर, आडगाव, खरगोन, बहिरपूर,मुबारकपूर, बिलाडी या परिसरात शेतीसाठी सुरळीत पणे  वीज  पुरवठा करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,गोपाल भंडारी,जिल्हा प्रसिद्धप्रमुख जालिंदर पावरा,करण सुळे ,बिरबल पावरा, सोमा पावरा, अरूण पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                  गेल्या २ महिन्यापासून गणोर ,आडगाव, खरगोन, बहिरपूर,मुबारकपूर, खरगोन, बिलाडी या  परिसरात शेतीसाठी २-३ दिवसाआड  ८ तासापैकी वीज पुरवठा मध्येच खंडीत होत असलियामुळे जेमतेम ३ ते ४ तास  कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतक-यांच्या शेतातील ऊस,कापूस व इतर पिकांचे आतोनात नुकसान होत आहे.त्यामुळे परिसराच्या शेतक-यांत प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पिकांचे नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे.शेतात पिक पिकले नाही,तर शेतकरी कर्जबाजारी होईल,उपासमारीची वेळ येईल.म्हणून या परिसरात सुरळीतपणे  वीज   चालू ठेवावी.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.होणा-या परिणामास सर्वस्वी जबाबदार वीज कंपनीतील संबंधित अधिकारी राहतील, याची नोंद घ्यावी.असा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments