Advertisement

मोफत वीज देणार,राहिलेल्या गांवात विद्युतीकरण करणार- सुशिलकुमार पावरा

बिरसा फायटर्सचे ध्येय क्रमांक:१७

शहादा:स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही 
नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात अद्यापही काही गांवात वीज पोहचली नाही.अनेक गांवातील लोक अंधारात राहतात . शेतक-यांना शेतीसाठी वेळेवर वीज मिळत नाही.त्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते.परिणामी शेतकरी हताश होतो आणि आतामहत्येसारखे पाऊल उचलतो.काही वीज ग्राहकांना अमाफ वीज बील आकारण्यात येते. ते सर्व सामान्य जनतेला परवरणारे नसते. म्हणून नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात वीज बिल शुन्यावर आणणे आवश्यक आहे.सर्वांनाच आवश्यक असणारी वीज मोफत देणार , राहिलेल्या गांवात विद्युतीकरण करणार, हे आमचे बिरसा फायटर्सचे ध्येय क्रमांक १६ राहील. 
      देशात फक्त दिल्ली व पंजाब राज्यातच २४ तास वीज मोफत दिली जाते.बाकीच्या राज्यांत हजारों रूपये वीज बील भरावे लागते. दिल्लीत २०२५ पर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे.सोलरच्या माध्यमातूनही वीज पुरवता येईल. दिल्ली व पंजाब सरकारच्या धर्तीवर २४ तास वीज मोफत देण्याचा प्रस्ताव केंद्र किंवा राज्य सरकारला देऊन वीज मोफत देण्यास आपण भाग पाडू,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments