Advertisement

काँग्रेस व भाजप उमेदवारांचा बॅन्ड वाजवणार- सुशिलकुमार पावरा

सुशिलकुमार पावरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शहादा :नंदूरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी आज २५ एप्रिल २०२४ रोजी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.जिल्हाधिकारी नंदूरबार मनिषा खत्री यांना उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला व उमेदवार म्हणून शपथ घेतली. नंदूरबार लोकसभाश्रॆत्र भ्रष्टाचार मुक्त करणे,रस्ते खड्डेमुक्त करणे,व्यसनमुक्त करणे,१०० पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे,५ वी ,६ वी अनुसूचि लागू करणे,१०० वनदावे मंजूर करणे, डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करणे अशे उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. भाजप व काँग्रेस उमेदवारांचे अद्याप निवडणूकीचे ध्येय ठरलेले नाहीत. पक्षाच्या केंद्रीय कमिटीने ठरविलेले जाहीरनामे वाॅटसप वर फिरताना दिसतात. नंदूरबार लोकसभाश्रॆत्रासाठी भाजप व काँग्रेस चे निश्चित ध्येय नाहीत. परंतु आम्ही सर्व सामान्यांचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवत आहोत. 
                         काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी व भाजपच्या उमेदवार हिना गावित हे निवडणूक पूर्वीच बॅन्ड वाजे आणून गाजावाजा करत आहेत.यांनी आधीच सर्व सामान्य जनतेचे बॅन्ड वाजवले आहेत.काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी धडगांव व अक्कलकुवा भागात ३५ वर्षांत भंगार रस्ते करून ठेवलेत.भाजपच्या हिना गावित नंदूरबार शहर ठिकाणी राहतात, तिथेही अद्याप कोकणीहील सारख्या भागात रस्ते झाले नाहीत, शहरातील रस्ते भंगार आहेत.काँग्रेस व भाजप वाल्यांनी जनतेचे व वाहनांचे आधीच बॅन्ड वाजवले आहेत. त्यामुळे नंदूरबार लोकसभाश्रॆत्रातली जनता मतदानाच्या माध्यमातून भाजप व काँग्रेस उमेदवारांची बॅन्ड वाजवणार आहेत. आम्हीही यांची आता बॅन्ड वाजवणार आहोत. ही निवडणूक नक्कीच आम्ही जिंकू. अशी प्रतिक्रिया बिरसा फाइटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली.

Post a Comment

0 Comments