Advertisement

पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त, अपक्ष उमेदवार सामाजिक कामांत मस्त

रस्ते,आरोग्य,बससेवा, रोजगार साठी बिरसा फायटर्सची ५ निवेदने

शहादा: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.भाजप पक्षाचे उमेदवार हिना गावित महिलांना साड्या वाटण्यात व 
काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोवाल पाडवी हे आपली स्वत: ची ओळख पटवून देण्यात व्यस्त आहेत. परंतु बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा अपक्ष उमेदवार मात्र सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी बिरसा फायटर्स नवापूर जि.नंदूरबार संघटनेकडून तहसीलदार नवापूर यांना रस्ते दुरूस्ती,रूग्णवाहिका उपलब्ध करून द्या,कामगारांना रोजगार द्या,मानधन द्या,बससेवा सुरू ठेवा या मागणीसाठी एकूण ५ निवेदन देण्यात आली.प्राथमिक आरोग्य केंद्र खांडबारा येथे १०८ रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करणेबाबत व डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी २४ तास उपलब्ध राहणेबाबत, नवापूर ते खोकसे बससेवा कायमस्वरूपी सुरू ठेवणेबाबत,बस सेवा बंद न करणेबाबत, खैरवा ते शेगवा पर्यंतचा खड्डेमय रस्ता दुरूस्ती करणेबाबत,सन २०१४-१५ या वर्षी ईगल सिक्युरिटी व पर्सनल सर्व्हिसिया प्राव्हेट संस्थेमार्फत आरोग्य विभागात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन मिळणेबाबत,चिंचपाडा,कामोद ,खोक्सा खड्डेमय रस्ता दुरूस्ती करणेबाबत निवेदन देण्यात आली.                   यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,गोपाल भंडारी,गाव अध्यक्ष राहूल चव्हाण,रवि पावरा,बिरबल पावरा,राहुल सुळे,प्रविण पावरा,करन सुळे,हिरामण खर्डे,गोविंद सुळे,महेंद्र माळी,अभय ठाकरे,रविन पावरा,मंगेश मोरे,सुरसिंग डुडवे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.सामाजिक कार्य करत राहणे, हा आमचा बिरसा फायटर्स संघटनेचा मुख्य उद्देश आहे.त्यामुळे आमचे सामाजिक कार्य हे सुरूच राहील, ते कधीही थांबणार नाही.अशी प्रतिक्रिया बिरसा फाइटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments