Advertisement

गिरोला येथे राणी दुर्गावती व बिरसा मुंडा महामानवाचे स्ट्च्यु अनावरण सोहळा संपन्न / आदिवासी संस्कॄती व परंपरा जपला तरच आरक्षण शक्य मंचकारून डाँ.सुरेश कुमार पंधरे यांचे प्रथिपादन

अर्जुनी/ सडक (९) गिरोला येथे राणी दुर्गावती व धरती आबा बिरसा मुंडा महामानव यांचे पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला. तिसर्या सत्राचे अनावरण, प्रबोधन सोहळ्याचे कार्यक्रम सहअध्यक्ष डाँ. सुरेशकुमार पंधरे व मनोहर चंद्रिकापुरे आमदार अर्जूनी/मोरगांव विधानसभा, उदघाटक तर अध्यक्ष राजकुमार बडोले माजी मंत्री,यांचे प्रमुख उपस्थीत सत्कारमुर्ती निशा तोडासे जिल्हा परिषद सदस्या,गोंदिया,चेतनदादा उईके,धर्मराज भलावी,भगवान भोडे,मालती किन्नाके,व विरांगणा राणी दुर्गावती सेवा समिती गोंदिया, व सरपंच पोलिस पाटील,भैय्या पुस्तोडे, सरपंच उमराव कापगते,व समाजबांधव हजर होते. या वेळी प्रमुख समाज सुधारक, सेवक डाँ सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स (FIGHTS FOR TRIBAL RIGHT FEDRATION OF INDIA) यांनी आपल्या ३० मिनिट
भाषणात समाजातील अनेक घातक परंपरा व संस्कॄतीचे रक्षक देश चालक भक्षक होवू पाहत आहेत. विस्थापित राज्य कार्यकर्ते यांनी संविधानाला कमजोर करून आमचे हक्क व अधिकाऱाला मनुस्मॄर्तीच्या चालीने भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मंना शपथेच्या वेळी मुत्र विसर्जन करून शुद्र असल्याची जाणीव करून दिली अशा षंढ व नंपुसक व्यवस्थेला उलथून फेकण्याचि गरज असल्याचे मत व्यक्त केले.आरक्षण हे आता टिकवायचे तर मेरिट नुसारच भर्ती होणार आहे म्हणुन आताचे गद्दार सरकार संविधानाला फाटा फोडुन आमदार संख्येच्या जादा आकयानुसार महाराष्ट्र सरकारचे अध्यक्ष व निवडणुक आयोग पासलेटीने निर्णय घेताहेत व गेल्या वर्षात जे  पुरोगामी थोरांचे व स्वतंत्र्याचे अपमान करणारी कंगणा राणावत व चंद्रकात पाटील यांचे निषेध व्यक्त करण्यात आले.जय जोहार हे हजारौवर्षापासून मनुस्मॄर्तीत जे घडायचे ती वर्णव्यवस्था होती त्या काळी वीर रणात  शहीद गेले.असत तेव्हा अग्नीकुंडात त्यांच्या विधवा सती जावून मरण पत्कारायच्या अशा व्यवस्थेचे बळी जायचे नसेल तर या देशाचे सुजान नागरिक होवून संविधानिक  शैक्षणिक,राजकीय,सामाजिक,धार्मिक उत्थान करण्या साठी समाजात शिक्षितांना उद्योगामुख होण्याची गरज आहे ती टेक्नालाजी तयार करण्यासाठी संघटनेतील राजकीय सामाजिक शिर्ष नेतॄव तयार करा व असे यौध्दे गुलामीची जाणीव होवू देणार नाहीत असा सक्षम संघटणेची गरज असल्याचे प्रतिपादन डाँ सुरेशकुमार पंधरे यांनी भाषणातून  समाजमन सुन्न केले. व पुढेही सावध पाऊला टाका व मनुवादी सरकारला नेस्नाबुत करा असा सज्जड सल्ला द़िला आहे.

Post a Comment

0 Comments